Hate Speech: भाजपचे दोन आमदार अडचणीत; प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हे दाखल, पोलिसांची हायकोर्टाला माहिती

Nitesh Rane And Geeta Jain: या वर्षी जानेवारी महिन्यात मीरा भाईंदर येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी या भाजप आमदारांनी दिलेली भाषणे अपमानास्पद होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Nitesh Rane And Geeta Jain
Nitesh Rane And Geeta JainEsakal

भाजपचे आमदार नितीश राणे आणि गीता जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. जानेवारीत ठाणे जिल्ह्यात झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी दोघांनीही आक्षेपार्ह भाषण केल्याचे तपासादरम्यान आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात संबंधित पोलिस आयुक्तांना या दोन्ही नेत्यांनी आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक भाषणे केली होती का, याची वैयक्तिक पडताळणी करण्यास सांगितले होते. (FIR On MLA Nitesh Rane And Geeta Jain)

सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी आज न्यायालयाला सांगितले की, या वर्षी जानेवारी महिन्यात मीरा भाईंदर येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी राणे आणि जैन यांनी दिलेली भाषणे अपमानास्पद होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

वेणेगावकर म्हणाले की, राणेंवर मुंबईतील मालवणी, मानखुर्द आणि घाटकोपर भागातील सभांमध्ये द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप आहे. तर, जैन यांच्यावर मीरा भाईंदरमधील सभेत द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप आहे.

Nitesh Rane And Geeta Jain
Bachchu Kadu: अमरावतीचे मैदान कोण मारणार? अमित शहांच्या सभेपूर्वी बच्चू कडू पोलिसांमध्ये बाचाबाची

सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी पुढे सांगितले की, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 153A (धर्माच्या आधारावर लोकांमध्ये शत्रुत्व वाढवणे), 504 (चिथावणी देण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

ते पुढे म्हणाले की, मीरा भाईंदरमध्ये 22 ते 26 जानेवारी दरम्यान उसळलेल्या जातीय हिंसाचाराच्या संदर्भात अन्य व्यक्तींविरुद्ध 13 स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे वेणेगावकर यांनी सांगितले.

Nitesh Rane And Geeta Jain
Mahadev Jankar Interview: 'मी लँडलॉर्ड, आता...'; बाहेरचा म्हणून हिणवणाऱ्या विरोधकांना जानकरांचे जोरदार प्रत्युत्तर

खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जून रोजी निश्चित केली. या वर्षी जानेवारीमध्ये ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे राणे, जैन आणि तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.

या याचिकांमध्ये दावा करण्यात आला आहे की, या भागातील जातीय हिंसाचारानंतर ही भाषणे देण्यात आली होती. याचिकांमध्ये आमदारांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची विनंती करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com