Amravati Crime News 
विदर्भ

Amravati Crime : दर्ग्याच्या आवारात दोघांचा खून

शेंदनी शिवारातील घटनेमुळे उडाली खळबळ

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : बडनेरापासून जवळच असलेल्या दडबडशहा बाबा या धार्मिकस्थळी दोघांचा निर्घृण खून करण्यात आला. गुरुवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली. अन्वर बेग अकबर बेग (वय ५०, रा. लालखडी, अमरावती) व शेख तौफिक अब्दुल रफीक (वय २५, रा. कारंजा लाड), अशी खून झालेल्या व्यक्तींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळा ते उत्तमसरा मार्गावर रस्त्यापासून शंभर मीटर अंतरावर एका शेतात शेंदनी शिवार हे घटनास्थळ येत असून, ते लोणी ठाण्याच्या हद्दीत आहे. यावर अखेर घटना उघडकीस आल्यानंतर सहा तासांनी शिक्कामोर्तब झाले. अन्वर बेग हा एक हात व पायाने अपंग आहे. तो पंधरा दिवसांपासून या दडबडशहा बाबा दर्गावर राहायला आला होता. तर शेख तौफिक हा तीन महिन्यांपासून या ठिकाणी राहत होता. सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास प्रथम ग्रामीण पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली.

ग्रामीण पोलिस पोहोचल्यानंतर घटनास्थळ आयुक्तालयाच्या हद्दीत असल्याचे सांगून शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. दडबडशहा दर्गा परिसरात आतमध्ये एक समाधिस्थळ स्लॅबच्या खोलीत असून दुसऱ्या बाजूने मोकळे टिनशेड आहे. तेथे राहण्याची व्यवस्था आहे. अन्वर बेग आणि शेख तौफिक रात्रीच्या वेळी झोपले. आज सकाळी शेतमालक आल्यानंतर त्यांनी आत बघितले असता दोघेही मृतावस्थेत पडून असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिस ताफा पोहोचला. अन्वर बेग याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला असून, शेख तौफिक याच्या डोक्यावर फाडीने वार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनास्थळाच्या संभ्रमामुळे पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांच्यासह शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे, पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार, गोपनीय विभागाचा ताफा दाखल झाला. दुपारी दोनच्या सुमारास अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपन कोल्हे यांनी पुन्हा भेट देऊन चौकशी सुरू केली होती. वृत्त लिहीपर्यंत खुनाचे कारण समजू शकले नव्हते.

या दुहेरी हत्याकांडाचा लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल. हत्येचे कारण, संशयित मारेकरी यांचा लवकरच शोध घेतला जाईल.

-अविनाश बारगळ, पोलिस अधीक्षक, अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT