पालकमंत्र्यांनी घेतली सेजलच्या बहीण, भावाच्या शिक्षणाची जबाबदारी sakal
विदर्भ

अमरावती : पालकमंत्र्यांनी घेतली सेजलच्या बहीण, भावाच्या शिक्षणाची जबाबदारी

कुटुंबाला आर्थिक मदत करत धीर

प्रशिक मकेश्वर

अमरावती : बुधवारी २० ऑक्टोबर रोजी तिवसा तालुक्यातील शिदवाडी येथील 17 वर्षीय सेजल गोपाल जाधव या मुलीने गरिबीला कंटाळून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती, तेव्हा या कुटुंबाची सातवन भेट घेऊन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सेजल च्या बहिण,भावाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत कुटुंबाला आर्थिक मदत करत धीर दिला.

गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक रोजगार बुडाले आहेत. जगणं कठीण झाले आहे. त्यातच वाढत्या महागाईने इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे जगणं अधिक असह्य झाल आहे. हे खरं असलं तरी तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी हार मानू नये,असं आवाहन अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.अमरावतीतील शिदवाडी येथे आत्महत्याग्रस्त मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. छिदवाडी येथील सेजल जाधव या 17 वर्षीय मुलीने आपल्या आई-वडिलांवर असलेल्या कर्जामुळे आणि शिक्षणासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने निराशेतून आत्महत्या केली होती,गेल्या तीन वर्षांपासून सतत असलेली नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शाळेत जाण्यासाठी गणवेश सुद्धा नसल्याचं या मुलीने आपल्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

तिने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत पालक मंत्री ठाकूर यांनी सदर कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना काही आर्थिक मदतही केली. दोन्ही मुलींच्या शिक्षणाची आणि एका मुलीच्या लग्नाची जबाबदारी सुद्धा त्यांनी यावेळी स्वीकारल्याचे जाहीर केले.

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शासनाच्यावतीने मदत मिळण्यासाठी तहसीलदार यांना सूचना दिल्या, सध्याचे वातावरण अतिशय नैराश्य पूर्ण आहे महागाईचा आगडोंब उसळतो आहे. मात्र तरीही हार न मानता तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केले, यावेळी तहसीलदार वैभव फरतारे, संदीप आमले, रविंद्र हांडे, रितेश पांडव, आशिष खाकसे, सरपंच रुचिता चव्हाण, मंगेश राठोड, अंकुश वेरूळकर, भारत ढोणे, गौतम ढोणे, रुपेश महल्ले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT