Navneet Rana. 
विदर्भ

खासदार नवनीत राणा यांना नागपूरला हलविले

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या खासदार नवनीत राणा यांना आज, अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. तेव्हापासून त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज, सोमवारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार नवनीत राणा रात्री नागपूरकडे रवाना झाल्या असून त्यांना नागपूर येथील ओक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची चमू नवनीत राणा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असे युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा, त्यांचे आई-वडील हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावरही नागपूरला ओक्हार्ट हॉस्पिटलमध्ये मागील आठवड्यापासून उपचार सुरू आहेत. त्यांच्याच कुटुंबातील इतर सदस्यांवर मात्र अमरावती येथील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा कोरोना रॅपिड टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील सुमारे दहा सदस्यांचे कोरोना चाचणी अहवाल चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्यावर आता खासदार नवनीत राणा यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे मुले तसेच कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष देण्यात नवनीत राणा व्यग्र होत्या. रवी राणा यांच्या आई-वडिलांवर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे श्री. राणा नागपूरला असून कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेण्यासाठी खासदार नवनीत राणा या अमरावतीतच होत्या. नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांची टेस्ट करण्यात आली. रॅपिड ऍण्टिजेन टेस्ट व थ्रोट स्वॅब घेण्यात आले. रॅपिड टेस्टमध्ये नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली होती.  

संपादन- अनिल यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT