Amravati teachers constituency election updates
Amravati teachers constituency election updates 
विदर्भ

अमरावतीत महाविकास आघाडी आणि भाजपला मोठा धक्का; अपक्ष किरण सरनाईक यांची आघाडी 

सुरेंद्र चापोरकर

अमरावती ः विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडी व भाजपला पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये धक्का देत पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते मिळविली असली तरी विजयासाठी त्यांना आणखी ८८२६ मते मिळवावी लागणार आहेत. विजयासाठी १४ हजार ९१६ मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला. त्यामुळे बाद फेरीत ही मते मिळवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. बाद फेरीची मतमोजणी सुरू झाली असून विजयी उमेदवार कळण्यासाठी पहाट उजाडण्याची शक्‍यता आहे.

शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण ३० हजार ८६९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्‍केवारी ८६.७३ आहे. या निवडणुकीत एकूण २७ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीत दोन्ही फेऱ्या मिळून ३०,९१८मतांपैकी १ हजार ८९ मते अवैध ठरली. गणना करण्यात आलेल्या २९ हजार ८२९ मतांमधून विजयासाठी १४ हजार ९१६ मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला.

पहिली व दुसरी फेरी मिळून किरण सरनाईक यांना ६०८८ मते मिळालीत. तर महाविकास आघाडीच्या प्रा. श्रीकांत देशपांडे यांना ५१२२, भाजपच्या डॉ. नितीन धांडे यांना २१२७, शेखर भोयर यांना ४८८९ व संगीता शिंदे यांना २८५७ तर, विमाशीच्या प्रकाश काळबांडे यांना १२१९ मते मिळालीत.

पहिल्या पसंतीच्या दोन्ही फेऱ्यांत सरनाईक यांनी आघाडी घेतली असली तरी निर्धारित कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना बाद फेरीत मते मिळवावी लागणार आहेत. बाद फेऱ्यांमध्ये मतांचा आकडा वाढविण्याची संधी सरनाईक यांच्यासह श्रीकांत देशपांडे व शेखर भोयर यांनाही असल्याने चुरस वाढली आहे.

भाजप सहाव्या क्रमांकावर

महाविकास आघाडीला टक्कर देण्याकरिता भाजपने रिंगणात उतरविलेल्या डॉ. नितीन धांडे यांना दोन्ही फेऱ्यांमध्ये २१२७ मते मिळाली होती. त्यावेळी ते सहाव्या क्रमांकावर होते. दुसऱ्या पसंतीच्या मतांवर आता त्यांना एकूण किती मते मिळतात हे अवलंबून राहणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT