file photo
file photo 
विदर्भ

अमरावती : तीन आमदारांनी राखला गड | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

अमरावती :  जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी केवळ तीनच आमदारांना आपले गड कायम राखण्यात यश आले. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षाच्या चारही आमदारांना नागरिकांनी नाकारले. धामणगावरेल्वे मतदारसंघ भाजपकडे नव्हता, तो यावेळी मात्र आला. बडनेऱ्याचे आमदार रवी राणा, तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर व अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे तीन आमदार परत एकदा विधानसभेत पोहोचले. यातील रवी राणा व यशोमती ठाकूर यांनी हॅट्ट्रिक साधली, तर बच्चू कडू चौथ्यांदा विजयी झाले आहेत.
धामणगावरेल्वे मतदारारसंघाचे आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, मोर्शीचे आमदार व कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, अमरावतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख व दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले यांना मतदारांनी नाकारले. सत्ताधारी पक्षाच्या तीन, तर एका विरोधी आमदाराला यावेळी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी नकार दिला. मेळघाटचे आमदार प्रभूदास भिलावेकर यांना भाजपने यावेळी उमेदवारी दिली नाही. त्यांच्या जागेवर रमेश मावस्कर यांना रिंगणात आणले होते. परंतु, त्यांना दारुण पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात लाट होती, हे आता स्पष्ट होत आहे. आपला गड कायम राखण्यात यशस्वी झालेले दोन आमदार अपक्ष आहेत. संघटनेच्या बळावर किल्ला लढविणाऱ्या या लढवय्यांनी प्रस्थापित पक्षांनासुद्धा धक्का दिल्याने त्यांच्या संघटनेची ताकद सर्वांसमोर आली आहे.
सुलभा खोडके परत आमदार
बडनेरा मतदारसंघाच्या माजी आमदार सुलभा खोडके सलग दोन निवडणुकीत बडनेरा मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. परंतु, त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते. त्यातूनच कॉंग्रेसने त्यांना अमरावतीतून उमेदवारी दिली व त्यांनी भाजपचे बलाढ्य उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT