विदर्भ

अमृतसाठी मिळतेय ‘तारीख पे तारीख’; तिनशे कोटी खर्चूनही भागली नाही यवतमाळकरांची तहान

चेतन देशमुख

‘जल है तो कल है’, या एका वाक्यातून पाण्याची उपयुक्तता लक्षात येते. पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावे, हा प्रत्येकाचा हक्क. परंतु यवतमाळमध्ये (Yavatmal district) नागरिकांच्या या मूलभूत हक्कावरच गदा आली आहे. एप्रिल २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे आॅनलाइन उद्घाटन केले. परंतु गेल्या चार वर्षांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या अमृत (Amrut Yojna in yavatmal) योजनेचे काम रखडले आहे. यामुळे पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन किती गंभीर आहे, हे दिसून येते. या योजनेद्वारे तब्बल तीनशे कोटी रुपये खर्च करून यवतमाळकरांची तहान भागवली जाणार असली तरी गेल्या चार वर्षांपासून काम सुरूच आहे, हा एकच नारा ऐकायला मिळतो. अगदी दुष्काळातही यवतमाळकरांना पाणी मिळाले नाही. अजूनही ‘तारीख पे तारीख’च दिली जात असल्याने सध्यातरी यवतमाळकरांसाठी ही योजना दिवास्वप्न ठरली आहे. (Amrut water supply project not complete after 4 years in yavatmal)

बाभूळगाव तालुक्याचा दौरा आटोपून सकाळीच यवतमाळला निघालो. बाभूळगावमार्गे यवतमाळला जाताना बेंबळा प्रकल्पातून यवतमाळसाठी जात असलेली जलवाहिनी नजरेस पडली. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी बेंबळा हा एक प्रकल्प. याच प्रकल्पावरून यवतमाळकरांची तहान भागविली जाणार आहे, अशी माहिती मिळाली. यवतमाळला पोहोचताच ‘सकाळ’चे यवतमाळचे शहर बातमीदार चेतन देशमुख यांनी रिसिव्ह केले.

शहरात पोहोचताच सर्वात आधी गोधनी मार्ग गाठला. येथील गुप्ताचा आलूबोंडा आणि चहा घेऊन ताजेतवाने झालो. याठिकाणी ‘मॉर्निंग वॉक’ करून येणारे अनेक नागरिक येत होते. त्यांच्याशी शहरातील समस्यांबाबत चर्चा केली. यात सर्वांच्या तोंडून ‘अमृत’चा विषय निघाला. त्यामुळे माहिती घेण्याचा मोह आवरला नाही. मग काय यवतमाळलगत असलेल्या टाकळी येथे सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामाच्या ठिकाणी पोहोचलो. जसजशी माहिती घेत गेलो, तसतसे ‘अमृत’ योजनेचे एक एक किस्से पुढे येत गेले.

यवतमाळ जिल्ह्याचे मुख्यालय. अनेक दिग्गज नेते, प्रशासनातील अधिकाऱ्यांचे येथे निवासस्थान. त्यामुळे या ठिकाणी सर्व आलबेल असेल, असा समज होता. बाभूळगाव-यवतमाळ गुळगुळीत रस्ता पाहून त्याची प्रचितीही आली होती. परंतु शहरातील रस्ते पाहून अल्पावधीतच हीच का तुमची यवतमाळ नगरी, असे म्हणण्याची वेळ आली. जुन्या बसस्थानकाचे काम सुरू असल्याने आर्णी मार्गावर विभागीय कार्यालयाच्या बाजूला नवे बसस्थानक आहे. मोठमोठे दगड व त्या ठिकाणी प्रचंड दुरवस्था दिसली. येथून काही अंतरावर असलेले जीवन प्राधीकरणचे कार्यालय गाठले.

याठिकाणी प्रभारी कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांची भेट झाली. त्यांच्याकडून योजना तसेच सध्याची कामाची स्थिती जाणून घेतली. त्यांच्यासोबत शाखा अभियंता अजय बेले होते. दोघांनी योजनेतील बारकावे, उशीर होण्याची कारणे याबाबत माहिती दिली. आता पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी कामाची डेटलाइन ठरवून दिल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. त्यामुळे काम वेळेत कसे पूर्ण करायचे याचे टेन्शनही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसले.

जलवाहिनीच्या कामामुळे लागली रस्त्यांची वाट

शहरातील प्रत्यक्ष स्थिती पाहण्यासाठी बाहेर निघालो. जागोजागी रस्ते खोदलेले दिसले. सहाजिकच याबाबत माहिती घेतली असता जलवाहिनीसाठी रस्ते खोदले, काम झाल्यानंतरही ते अजूनही तसेच असल्याचे समजले. त्यामुळे पाण्यासाठी यवतमाळकरांची खड्ड्यातून वणवण सुरू असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे आधी रस्ता करून नंतर जलवाहिनीसाठी खोदकाम केल्याचा नवीन प्रयोग याठिकाणी करण्यात आला. त्यामुळे कोट्यवधींचा खर्चही ‘खड्ड्यात’ गेला.

नगरपालिकेत नाही पूर्णवेळ मुख्याधिकारी

दत्त चौकात पोहोचताच ‘कचरा असलेले स्वच्छ सुंदर शहर’ नजरेत भरले. पालिकेतील विरोधी पक्षनेते चंद्रशेखर चौधरी, नगरसेवक पंकज मुंदे यांच्यासह शहरातील व्यापारी आनंद शर्मा, देवा राऊत, वैभव जवादे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. घनश्याम दरणे आदी विविध क्षेत्रांतील मंडळी भेटली. यांच्याशी संवाद साधला. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी यांचीही भेट झाली. त्यांनी योजनेच्या नियोजनावर टीका केली. पालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलो असता पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याचे समोर आले. त्याचवेळी कचरा प्रश्‍नावर सुरू असलेल्या चढाओढीच्या राजकारणाचा प्रत्यय आला. या राजकारणात जनता भरडली जात असल्याचेही दिसले. २०१७ व २०१८ मध्ये नागरिकांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागला. चढाओढीच्या राजकारणात काही नेत्यांनी पाणीपुरवठा सुरू होण्याच्या तारखा जाहीर केल्या. मात्र, अद्याप यवतमाळकरांचा घसा कोरडाच आहे.

पहिल्या तपासणीत पितळ उघडे

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराची तहान भागविण्यासाठी एप्रिल २०१७ मध्ये अमृत योजनेचे ऑनलाइन उद्घाटन केले. निधी मंजूर झाला. कामाला सुरुवात झाली. जलवाहिनीची तपासणी करतानाच पहिला धक्का योजनेला बसला. निकृष्ट पाइप पुरवठा झाल्याने यातील ‘पितळ’ उघडे पडले. यासंदर्भात नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी तक्रार केली. त्याची दखल घेत संबंधित कंपनीला पूर्ण पाइपलाइन बदलून देण्याची वेळ आली.

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांची तिसरी डेटलाइन

चार वर्षांपासून योजनेचे काम सुरू असूनही पूर्ण झालेले नाही. पालकमंत्री संदीपान भुमरे व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यात लक्ष घातले. नागरिकांची होणारी अडचण पाहता योजनेचे काम गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. अमृत योजनेचे काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. त्यामुळे उर्वरित २० टक्के काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री भुमरे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता तिसरी डेटलाइन पूर्ण होणार की चुकणार, हेच पाहायचे आहे.

मुख्य जलवाहिनीचे तीन किलोमीटरचे टेस्टिंग बाकी

मुख्य जलवाहिनीचे तीन किलोमीटरचे टेस्टिंग व्हायचे आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काही काम शिल्लक आहे. त्यामुळे ४५ दिवसांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हे काम पूर्ण करण्याचे कसब दाखवावे लागणार आहे. शहरातील जलवाहिनी खिळखिळी झाल्याने अनेक प्रभागांमध्ये तर बाराही महिने पाणीटंचाई असते. अशा परिस्थितीत ही योजना महत्त्वपूर्ण असताना अमृत योजनेचे पाणी शहराला मिळाले नाही.

केंद्र तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा करून यवतमाळ शहरासाठी ही योजना मंजूर करून घेतली. यवतमाळकरांची भविष्यातील अडचण या योजनेतून कायमची दूर होणार आहे. सध्या योजनेचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या काही दिवसांत पूर्ण करून घेण्यासाठी सातत्याने आढावा घेत आहे. नागरिकांना पाण्यासाठी फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. यासोबतच भूमिगत गटार योजनेचीही कामे सुरू आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर शहरातील सांडपाण्याचा प्रश्नही कायमचा सुटेल.
-मदन येरावार, आमदार, यवतमाळ विधानसभा मतदारसंघ

(Amrut water supply project not complete after 4 years in yavatmal)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT