corona virus 
विदर्भ

मोठी बातमी : चंद्रपुरात कोरोनाचा दुसरा धमाका, आणखी एका मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह

सकाळवृत्तसेवा

चंद्रपूर : कोरोना संक्रमनाच्या काळात विदर्भातील चंद्रपूर जिल्हा योग्य उपाययोजनांमुळे ग्रीन झोनमध्ये होता. त्यानंतर मात्र एक रुग्ण सापडल्याने जिल्ह्याच एकत खळबळ उडाली होती. यापाठोपाठ बुधवारी आणखी एका रुग्णाची भर पडल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

शहरातील बिनबा वॉर्डातील एक चोवीस वर्षीय युवती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली. या युवतीच्या आईवर यवतमाळ जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. नऊ मे रोजी हे कुटुंब खासगी वाहनाने चंद्रपुरात आले. तेव्हापासून हे कुटुंब क्वारांटाइन होते. या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्या कुटुंबीयातील एका मुलीचा अहवाल बुधवारी पॉझिटीव्ह निघाला. त्या कुटुंबातील अन्य सदस्यांचे नमुन्यांची प्रतीक्षा आहे.


नागपुरात दोन दिवसांत ९ गर्भवती मातांना बाधा
नागपूर : थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उपराजधानीत दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची बाधा असलेले नवीन वस्तीतील नागरिक आढळून येत आहेत. त्यातच सतरंजीपुरा आणि मोमिनपुरा हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्याने येथील रहिवासी अजूनही कोरोनाबाधित आढळून येत आहेत. बुधवारी (ता.1३) कोरोनाचे आणखी १० रुग्ण वाढले. यामध्ये पाच गर्भवती मातांचा समावेश आहे. मंगळवारी देखील चार गर्भवती मातांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे गर्भवती मातांना कोरोनाचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

Blistering Heat : शहरी भागांत उष्णतेच्या झळा तीव्र; ३४ वर्षांत ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ

रश्मिका मंदानाने पहिल्यांदाच दाखवलं तिचं मंगळसूत्र; इतकं साधं अन् सुंदर की जान्हवीचं मंगळसूत्रही विसराल!

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Stray Dog Attack : आईसोबत चाललेल्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला; प्रसंगावधान राखून आईने स्वतःच्या अंगावर हल्ला झेलत मुलाचे प्राण वाचवले, झटापटीत आई गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT