akola
akola 
विदर्भ

मी दगड फोडले, मुलीने त्यातून पदक घडविले 

अनुप ताले

अकोला : दगडं फोडून मी विहिरी खोदल्या, पती-पत्नीने शेतमजुरी केली आणि मुलीला कृषी अभ्यासक्रमात घातले. तिनेही माय-बापाच्या कष्टाचे चिज करत, पदवी अभ्यासक्रमात अव्वल स्थान प्राप्त केले आणि पदक कमावून आम्हाला अभिमानाचे पारितोषिक मिळवून दिले. कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात रौप्य पदकावर नाव कोरलेल्या एकलारा येथील अनुराधा मनोहर चोपडे हिच्या वडिलांनी, अशा शब्दात त्यांचे भाव प्रकट केले. 

बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथे आमचे वास्तव्य असून, एक मुलगी, एक मुलगा आणि पती-पत्नी असा छोटासा परिवार आहे. मालकीची एक एक्कर जमीन, त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा आणि मुलांना भक्कम शिक्षणही द्यायचे, असा आमचा ध्यास; पण हे करायचे कसे? माझे शिक्षण दहावीपर्यंत आणि अनुराधाच्या आईचे (संगिता) सातवीपर्यंत. त्यामुळे दोघानीही शेतात राबायचे ठरविले. सोबतच मी शेतमजुरी तसेच परिसरातील शेतात विहीर खोदकाम सुरू केले आणि मुलीला डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत, जळगाव जामोद येथील कृषी महाविद्यालयात बी.एसस्सी. फॉरेस्ट्री अभ्यासक्रमाला धाडले.

मुलगाही पॉलीटेक्निक इंजनिअरींग करीत आहे. दोघांच्या शिक्षणासाठी आमची दोघांचीही कमाई पुरेसी नव्हती. तेव्हा व्याजाने काही रक्कम घेतली व पत्नीनेही दागिणे मोडली. पोरीला आमच्या कष्टाची जाणीव होती सोबतच तिला अभ्यासात आवड निर्माण झाली. त्यामुळे तिने अभ्यासात सर्वस्व ओतले आणि बी.एसस्सी. फॉरेस्ट्रीमध्ये सर्वाधिक गुण मिळवून रौप्य पदक पटकाविले. डबडबत्या डोळ्यांनी मुलीचा अभिमान व्यक्त करत, तिची इच्छा असेल तेवढे शिक्षण देण्याचा निश्चय, मनोहर चोपडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

माझे आई-बाबा रात्रंदिवस कष्ट उपसून आम्हा भावंडांना शिक्षण देत आहेत. मी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. सध्या मी एम.एससी. करीत असून, त्यानंतर पी.एच.डी. करायची आहे. 
- अनुराधा मनोहर चोपडे, एकलारा, जिल्हा बुलडाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT