विदर्भ

मुख्यमंत्र्यांविरोधात आशीष देशमुख

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुख्यमंत्र्यांविरोधात दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधून लढण्यासाठी कॉंग्रेसला अखेर उमेदवार मिळाला आहे. काटोलचे माजी आमदार आशीष देशमुख यांना त्यांच्याविरोधात मैदानात उतरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि आशीष यांचे वडील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख याआधी एकमेकांविरोधात लढले आहेत. 
अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण लढणार, अशी चर्चा होती. सुरुवातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यानंतर प्रशांत पवार, माजी खासदार गेव्ह आवारी यांचीही नावे चर्चेत होती. शहर कॉंग्रेसतर्फे माजी नगरसेविका रेखा बाराहाते व किशोर उमाठे यांनी नावे नागपूरमधून पाठविली होती. परंतु, कॉंग्रेस सक्षम व लोकप्रिय उमेदवाराच्या शोधात होती. आज आशीष देशमुख यांना मुख्यमंत्र्यांविरोधात उतरविण्यात आले. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करून आमदारकीचा राजीनामा दिला होता. 
दक्षिण-पश्‍चिमसह कामठी आणि रामटेकच्या उमेदवारांची नावे कॉंग्रेसने रोखून ठेवली होती. रामटेकमधून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक इच्छुक होते. दोन वर्षांपासून त्यांनी तयारीसुद्धा केली होती. बाहेरचा उमेदवार म्हणून अपप्रचार होऊ नये याकरिता त्यांनी घरही घेतले होते. रोजच ते रामटेकला भेट देऊन बांधणी करीत होते. यामुळे स्थानिक कॉंग्रेसचे पदाधिकारी नाराज होते. चंद्रपाल चौकसे, बाबूराव तिडके, उदयसिंग यादव यांच्यासह अन्य नेत्यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. भूमिपुत्र असा नाराही त्यांनी दिला. अमोल देशमुख हेसुद्धा उमेदवारीसाठी कामाला लागले होते. शिवसेनेचे माजी आमदार आशीष जयस्वाल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही दिवसभर चर्चा होती. देशमुखांसह अनेकांनी विरोध करून आज आंदोलन केले होते. 
रात्री दहाच्या सुमारास कॉंग्रेसने उदयसिंग ऊर्फ गज्जू यादव यांच्या नावाची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. कामठीमध्ये सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT