file photo 
विदर्भ

रात्री घरी उशिरा पोहोचल्याने घरचे रागावले; मग त्या मुलींनी घेतला हा निर्णय...

सकाळ वृत्तसेवा

साखरीटोला (जि. गोंदिया) : रात्री घरी उशिरा पोहोचल्याने घरचे रागावले. हा राग मनावर घेऊन तरुणीने विहिरीत उडी घेतली. तिच्या मैत्रिणीनेही घरचे सगळे लोक मलाच दोष देतील, म्हणून विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (ता. 7) सकाळी सहाच्या सुमारास सालेकसा पोलिस ठाण्याअंतर्गत कवडी येथे घडली. 

रोशनी सुखराम चित्रीव (वय 17) असे मृत मुलीचे नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी व तिची मैत्रीण कल्पना (काल्पनिक नाव) या दोघीही शनिवारी (ता. 6) रात्री दहा वाजताच्या सुमारास ठाणा येथील तीन मित्रांसोबत बाहेर गेल्या होत्या. रात्री बराच उशीर होऊनही त्या परतल्या नव्हत्या. ही बाब रोशनीच्या लहान भावाला माहीत झाली. त्याने तिला रागावले व ती गोष्ट आईवडिलाला सांगितली. 

आईवडिलांनी तिला समजावले; परंतु रोशनीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. इकडे घराजवळ असलेल्या कल्पनाला (काल्पनिक नाव) रोशनीने आत्महत्या केल्याचे समजले. ती घाबरली. सगळे लोक मलाच म्हणतील, या कारणाने तिनेसुद्धा शासकीय विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळच असलेल्या लोकांनी तिला वाचविले. लगेच सालेकसा पोलिसांना माहिती देण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Marathi News Live Updates : कऱ्हाडला नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद; पोलिस बंदोबस्तातही वाढ

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT