agitation
agitation 
विदर्भ

"समृद्धी नाही, हा तर बरबादी महामार्ग'

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - नागपुर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदी करण्याची प्रक्रीया शासनातर्फे सुरु करण्यात असून हा शासनाचा व प्रशासनाचा मनमानीपणा आहे. हा समृद्धी नसून बरबादी महामार्ग असल्याने तो रद्द करावा यासाठी समृद्धी महामार्गा विरोधी संघर्ष समिती, भापक, किसानसभा, शेजमजुर युनियनतर्फे बुधवार (ता.24) जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी निदर्शने केली. 

नागपुर-मुंबई समृद्धी महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातून जात आहे. वैजापुर तालुक्‍यातील 1100 एकर, गंगापुर तालुक्‍यातील 600 तर औरंगाबाद तालुक्‍यातील 36 गावातील 1300 एकर जमीन संपादीत केली जाणार आहे. मागील वर्षी जमीन खरेदीसाठी पारंभिक अधिसूचना जुलै 2016 मध्ये शासनाने प्रसिद्ध केली होती. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी नमुना नंबर चार मध्ये हरकती नोंदविल्या होत्या. त्या हरकती प्रलंबित असतांना नवीन नोटीस प्रसिद्ध करुन खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीस हरकती मागविण्यात आल्या आहे. शेतकरी, गावकऱ्यांची संमती नसतांना खाजगी वाटाघाटीची नोसी प्रसिद्ध करुन हरकती मागवणे हे बेकायदेशी व शेतकऱ्यांची बदनामी, अवमान करणारे आहे. विकास प्रकल्पासाठी 2013 च्या भुसंपादन कायद्यानुसार जमीन संपादीत करण्याऐवजी लॅंड पुलिंग (भुसंचयन) किंवा खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदी करणे म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणे आहे असे निवेदनामध्ये नमुद करण्यात आले.

यावेळी प्रा. राम बाहेती, नानासाहेब पळसकर, ऍड. अभय टाकसाळ, मधुकर खिल्लारे, कैलास कांबळे, गणेश कबसे, कालुभाई शेख, भाऊसाहेब कोलते, बाळु जगदाळे, योगेश दांडगे, सुभाष बर्डे, सुर्भभान पल्हाळ, बाळु हेकडे, कल्याण पळसकर यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT