balabhau
balabhau 
विदर्भ

मृत्यूशी झुंज देतानाही त्याची ‘सर्पसेवा’!

सकाळवृत्तसेवा

अकोला : निर्सगाने तयार केलेल्या प्रत्येक जीवाचे अस्तित्व हे निर्सग संवर्धनासाठी आवश्‍यक आहे. याची जाणीव ठेवत कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत बाळ काळणे या सर्पमित्राने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. मृत्यूशी झुंज देत असतानाही सोमवारी (ता. 3) त्यांनी गौरक्षण रोड परिसरातील भरतीया यांच्या घरी निघालेला साप पकडला आणि निसर्ग संवर्धनासाठीचा आपला संघर्ष आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहील, हे दाखवून दिले. 

अकोल्यातील सर्पमित्र बाळ काळणे गत काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. त्यांच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रियाही झाल्या आहेत. अगदी मृत्यूशी ते झुंज देत आहे. अशा अवस्थेतही बाळाभाऊंच्या सेवेची समाजाला गरज पडली तेव्हा ते आर्वजून हजर झाले. सोमवारी त्यांनी त्याचा प्रत्ययही दिला. गाैरक्षण रोडवर भरतीया यांच्या घरी निघालेला साप पकडण्यासाठी त्यांना बोलाविण्यात आले. त्यांनीही माहिती मिळताच स्वतः तेथे पोहोचत सापाला जीवदान दिले. साप वाचवून निसर्गातील जीवसृष्टीच्या संवर्धनाचे कर्तव्य बजाविताना त्यांनी स्वतःच्या आजाराचीही तमा बाळगली नाही. कर्करोगाशी संबंधित दोन-दोन अवघड शस्त्रक्रिया झाल्यानंतरही त्यांनी त्यांचे कर्तव्य चोखपणे बजावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. 

हातात कर्करोगाचा अहवाल अन्....
बाळाभाऊंच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतो! कारण, सर्व प्रथम त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले तेव्हा त्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल हातात असतानाही ते साप पकडण्यासाठी सेवेत कार्यरत होते. आता त्याच जीवघेण्या रोगाशी संघर्ष करीत असताना आणि दोन-दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतरही बाळाभाऊ साप पकडण्याची सेवा अविरतपणे देत आहेत. खरच या माणसाच्या जिद्दीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. देशातील अशी ही एकमेव सर्पसेवा असावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT