file photo
file photo 
विदर्भ

भंडारा : अन्‌ चुलतभाऊच झाला वैरी...

सकाळ वृत्तसेवा

लाखांदूर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील दांडेगाव जंगल परिसरात 25 ऑक्‍टोबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मोहनलाल मधुकर मातेरे (वय 45, रा. भागडी) हे जखमी अवस्थेत सापडले. या घटनेत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचे लक्षात येताच लाखांदूर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून सोमवारी (ता. 18) तीन आरोपींना अटक केली.

आरोपींच्या कबुली जबाबावरून चुलतभावाने घरगुती व शेतीच्या वादातून साठ हजार रुपयांची "सुपारी' देऊन मोहनलाल यांना जीवे मारण्याच्या कटकारस्थान रचल्याचा प्रकार समोर आला आहे.

भागडी येथील मोहनलाल मातेरे हे सायंकाळच्या सुमारास गंभीर जखमी अवस्थेत दांडेगाव जंगल परिसरातील रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे गुरख्याला दिसून आले. याची माहिती लाखांदूर व दिघोरी/मो. पोलिसांना देण्यात आली.

ग्रामीण रुग्णालयात दाखल
लाखांदूरचे तत्कालीन ठाणेदार मनोहर कोरेटी यांनी आपल्या खासगी वाहनातून मोहनलाल यांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथील खासगी रुग्णालयात पोहोचविण्यात आले. जखमी मोहनलाल शुद्धीवर नसल्याने पोलिसांना या घटनेतील धागेदोरे मिळण्यास विलंब झाला. यामुळे पोलिस अधीक्षकांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला पाठविले.

पथकाने सोमवारी (ता. 18) सायंकाळच्या सुमारास तीन संशयितांना तपासासाठी नेले. यावेळी तपासादरम्यान, संशयितांनी गुन्हा केल्याने मारेकरी तेच असल्याचे स्पष्ट झाले. प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. यात जखमीचा चुलतभाऊ राहुल जाधव मातेरे (वय 21, रा. भागडी), चेतन बाबूराव लंजे (वय 19, रा. बारव्हा), निखिल अरविंद कापगते (वय 26, रा. बारव्हा) या आरोपींची समावेश आहे.

शेतीच्या वादातून घडली घटना
यातील मुख्य आरोपी चुलतभाऊ राहुल मातेरे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घरगुती व शेतीच्या वादातून मोहनलालला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचे कबूल केले. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडके, पोलिस निरीक्षक शिवाजी कदम, भंडारा येथील विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक जटाल, नायक पोलिस हवालदार मडावी, हवालदार पन्नाळे, वाघाडे, काळसरपे, डुलगुंडे व वैरागडे यांनी ही कारवाई केली आहे.

असा घडला जिवे मारण्याचा प्रकार
मोहनलाल मातेरे हे नेहमी आरोपी चुलतभाऊ राहुल यांच्या घराच्या दाराला लाथा मारून भांडण करीत असे. तसेच त्यांच्यात शेतीचा वाद सुरू होता. या त्रासाला कंटाळून राहुलने लाखांदूर येथील आर्मी पोलिस ऍकॅडमीतील प्रशिक्षणार्थी मित्र चेतन बाबूराव लंजे व निखिल ऊर्फ गोलू अरविंद कापगते यांना मोहनलालला जिवे मारण्यासाठी साठ हजार रुपयाची सुपारी दिली. 25 हजार रुपये टोकन रक्कम दिली. घटनेच्या दिवशी 25 हजार दिले होते. काही दिवसानंतर 20 हजार रुपये देण्याचे कबूल केले होते.

मृत्यू झाल्याचे समजून पळ काढला
झालेल्या करारानुसार चेतन लंजे व निखिल कापगते यांनी मोहनलालला कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून आपल्या दुचाकीवर भागडी येथून लाखांदूरला आणले. त्यांनतर दांडेगाव जंगल परिसरातील रस्त्याच्या कडेला नेऊन जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. मोहनलाल बेशुद्ध पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजून त्यांनी तिथून पळ काढला. मात्र, गुराख्यास मोहनलाल जखमी अवस्थेत पडलेल्या स्थितीत आढळला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली व आरोपींना अटक केली.

पोलिसांना चकमा देण्याचा प्रकार
मोहनलाल यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करून पोलिसांना चकमा देण्याचा प्रकार करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. कुडेगाव येथील सोहम मानकर या विद्यार्थ्याच्या खुनातील आरोपींना लवकरच जेरबंद करू. तपास वेगाने सुरू आहे.
- शिवाजी कदम, ठाणेदार, लाखांदूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांमधून विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; बॉम्बची धमकी आल्यामुळे प्रशासन अलर्ट

T20 World Cup 2024 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT