bhandara district hospital fire report give to government by inquiry committee
bhandara district hospital fire report give to government by inquiry committee 
विदर्भ

भंडारा जिल्हा रुग्णालय आग : चौकशी अहवाल शासनाकडे, अहवालात नेमके दडलेय काय?

केवल जीवनतारे

नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू कक्षाला लागलेल्या आगीत १० शिशूंचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून तर सर्वच मंत्री, अधिकारी, मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांनी घटनास्थळाला भेटी दिली होती. प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या घटनेला ११ दिवस उलटून गेले. प्राथमिक चौकशी अहवाल शासनाकडे सादर केला. ही दुर्घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याचे अहवालात असल्याची दाट शक्यता आहे. मात्र, घटेनेतील दोषींवर अद्याप निलंबनाची कारवाई झाली नाही. बाळ गमावलेल्या त्या दुर्दैवी माता न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. कारवाईचा फास आवळण्यास उशीर का होत आहे, हे गुढ कायम आहे. 

नवजात शिशूंचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या या प्रकरणात प्राथमिक जबाबदारी असलेले जिल्हा शल्यचिकित्सक, रात्रपाळीत कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित होते. कारवाईनंतर चौकशी करण्यात येईल अशी अपेक्षा या सरकारकडून होती. मात्र, तसे झाले  नाही. अहवाल सादर झाल्यानंतर ज्या  संबंधितांवर ठपका ठेवण्यात आला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. कारवाईला उशीर का होत आहे, हेच कळायला मार्ग नाही. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ चौकशी समिती तयार करण्यात आली. मात्र, कारवाईला विलंब होत असल्याने या प्रकरणातील गंभीरता कमी आहे. चौकशी समितीकडून दोषींवरील कारवाई पेक्षा उपाययोजना सांगण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्या मातांचा आक्रोश -  
आठ जानेवारीला मध्यरात्रीनंतर भंडाऱा जिल्ह्य सामान्य रुग्णालयात ही घटना घडली होती. एकाचवेळी १० चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर मातांचा आक्रोशाने रुग्णालयाच्या भिंतीना पाझर फुटला. त्या मातांचा हा आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. त्या मातांचे सांत्वन करण्यासाठी सारे सरकार तेथे आले, मात्र अद्याप या बाळ गमावलेल्या दुर्दैवी माता न्यायापासून वंचित आहेत. जणूकाही घडलेच नाही, असे चित्र येथे असून जिल्हा शल्यचिकित्सक असो, वैद्यकीय अधिकारी असो की,  परिचारिका सारे व्यवहार सामान्यपणे सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT