akola
akola 
विदर्भ

Bharat Bandh : अकोल्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

विवेक मेतकर

अकोला : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढलेल्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (ता. 10) देशव्यापी बंदची हाक दिली आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातही बंदचे आवाहन करण्यात आला. मात्र, महागाईसारख्या विषयावर कॉँग्रेस, राष्ट्रवाही आणि मनसेसह विविध पक्षांच्या बंदला संमीश्र प्रतिसाद मिळाला. 

एकत्र येऊनही विरोधक विखुरलेलेच
पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने अवास्तव आणि अन्याय्य दरवाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने उद्या, 10 सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारला. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला तरीही बंदची व्यापकता वाढण्याएेवजी मोजक्या कार्यकर्त्यांसह निघालेल्या रॅलीने अकोलेकरांचे लक्ष तर वेधले. मात्र, बंद यशस्वी करण्यात मोठा प्रयत्न झाला नाही. 

सकाळपासून शाळा बंदचा संभ्रम
सोमवारी सर्व विरोधी पक्षांनी बंदचे आवाहन केले आहे. अशावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. मात्र, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस प्रशासकीय सुटी आल्याने सोमवारच्या बंदच्या वेळी शाळा बंद ठेवण्याबाबत शाळा व्यवस्थापनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शहरातील बहुतांश शाळा सुरू असल्याने बंदचा प्रभाव दिसला नाही. 

पेट्रोल पंप दुपारी 12 वाजेपर्यंत बंद
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंप दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोल-डिझेल डिलर, विक्रेते असोशिएनने घेतला होता. 

बससेवा सुरू
देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले असले तरी महागाईच्या विरोधात शांततेत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी बस सेवा नियमित सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे आली. या बंदचा एसटीच्या सेवेवर परिणाम जाणवला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT