BJP announces candidature to Sandeep Joshi for nagpur graduation constituency election  
विदर्भ

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक : भाजपकडून संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - भाजपकडून  नागपूर पदवीधर मतदारसंघातून  महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नितीन गडकरी या मतदारसंघातून निवडून येत होते. त्यानंतर आता गडकरींचा वारसदार कोण? असा प्रश्न पडला होता. त्यासाठी अनिल सोले आणि महापौर संदीप जोशी यांच्या नावाची चर्चा होती. आता जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याआधी काँग्रेसकडून अ‌ॅड. अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली. 

नागपूरच्या पदवधीर मतदारसंघात आजवर भाजपचेच वर्चस्व आहे. दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार येथून निवडून आलेला नाही. गडकरी यांची राजकीय कारर्कीदच या निवडणुकीने घडविली. त्यांचे वारसदार म्हणून अनिल सोले यांनी हा मतदारसंघ भाजपकडे शाबूत ठेवला. मात्र, संदीप जोशी यांचे आव्हान त्यांच्यासमोर होते. पक्षाने उमेदवारी दिली तर लढण्यास तयार आहे, असे सांगून जोशी यांनी आपले इरादे स्पष्ट केले होते. माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा कौल यंदा मिळेल असा विश्वासही त्यांना होता. अखेर तो खरा ठरला आहे. आज त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर त्यांचे महापौरपद दयाशंकर तिवारी यांना देण्याची शक्यता आहे. 
काँग्रेसतर्फे प्राध्यापक बबनराव तायवाडे यांनी भाजपला दोनवेळा येथून जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. आता तरुण दमाचे अभिजित वंजारी  यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.  अनेक संघटना आणि आघाड्यांचेही उमेदवार इच्छुक असल्याने यंदा ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. 

अशी होईल निवडणूक - 
उमेदवारी अर्ज दाखल - ५ ते १२ नोव्हेंबर 
छाननी - १३ नोव्हेंबर 
अर्ज मागे घेण्याची मुदत - १७ नोव्हेंबर 
मतदान - १ डिसेंबर
मतमोजणी - ३ डिसेंबर

दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळीत दिल्ली-NCRमध्ये हवा बनली विषारी, श्वास घेणंही कठीण; AQI ४००च्या वर, १२ कलमी अ‍ॅक्शन प्लॅन लागू

Solapur Accident: इंचगावजवळ अपघातात एक ठार, एक जखमी; पिकअपची दुचाकीला मागून धडक; राष्ट्रीय महामार्गावर घटना..

Ramraje Naik-Nimbalkar: आता लढायचं, पक्ष कुठला ते नंतर बघू: रामराजे नाईक-निंबाळकर; कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नेमकं काय म्हणाले?

Minister Muralidhar Mohol: जैन बोर्डिंग व्यवहाराशी संबंध नाही: राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ; मी संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर व्यवहार, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News : महाराष्ट्राला केंद्राकडून १५६६ कोटींची मदत; पूरग्रस्तांसाठी दिलासा

SCROLL FOR NEXT