विदर्भ

हा भाजप आहे, काँग्रेस-राष्ट्रवादी समजू नका; इशारा कोणाला?

कृष्णा लोखंडे

अमरावती : माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मर्जी मिळवणाऱ्या व पाहणी दौऱ्यात जबरदस्तीने घेऊन जाणारे आमच्याशी पंगा घेत असतील तर त्यांची दुर्दशा केल्याशिवाय राहणार नाही, असा खरमरीत इशारा भाजपचे माजी राज्यमंत्री तथा विधान परिषदेचे सदस्य प्रवीण पोटे यांनी आमदार रवी राणा व युवा स्वाभिमान पक्षाला दिला आहे.

महापालिका आमसभेत मंगळवारी (ता. १७) युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी घुसून घातलेल्या धुडगुसाचा निषेध करण्यासाठी भाजपने बुधवारी जयस्तंभ चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा आयोजित केली होती. यावेळी पोटे बोलत होते. त्यांनी भाषणातून सोमवारी राजापेठ उड्डाणपुलाची देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राणांसोबत केलेल्या पाहणीचा उल्लेख करीत राणांना इशारा दिला. उड्डाणपुलावर त्यांची जायची इच्छा नव्हती, नाइलाजाने त्यांना जावे लागले, असा खुलासा प्रवीण पोटे यांनी केला.

आमसभेत घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी भाजपने बुधवारी जयस्तंभ चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निषेध सभा आयोजित केली होती. सभेस विधान परिषदेचे सदस्य प्रवीण पोटे, शहराध्यक्ष किरण पातूरकर, महापौर चेतन गावंडे, पक्षनेते तुषार भारतीय, स्थायी समिती सभापती सचिन रासने, नगरसेवक विवेक कलोती, संजय वानरे, सुनील काळे, चंद्रकांत बोमरे, प्रणीत सोनी, आशिष अतकरे, राजेश पड्डा, अजय गोंडाणे, नगरसेविका नूतन भुजाडे, सुरेखा लुंगारे, लविना हर्षे, रिता मोकलकर, जयश्री डहाके, इंदू सावरकर, सुनंदा खरड, राधा कुरील, संगीता बुरंगे, गंगा अंभोरे, अनिता राज यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जयंत डेहनकर, किरण पातूरकर, महापौर चेतन गावंडे, तुषार भारतीय यांचीही भाषणे झालीत.

आम्हाला त्यांची गरज नाही

गुंड व मवाल्यांना सोबत घेऊन आमसभेत गोंधळ घालण्याने भाजप घाबरून जाईल असे त्यांना वाटत असेल तर त्यांची आम्ही दुर्दशा केल्याशिवाय राहणार नाही. हा भाजप आहे, आम्हाला त्यांची गरज नाही, त्यांनी आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादी समजू नये, असा खरमरीत इशारासुद्धा प्रवीण पोटे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT