file photo
file photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : निंदनीय! मध्य नागपुरात कॉंग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्य नागपुरात निवडणुकीवरील आयोजित कार्यक्रमात भाजप व कॉंग्रेस कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक, शिवीगाळ करीत कार्यक्रमच उधळून लावला. या राजकीय दंगलीमुळे चांगलीच खळबळ माजली. 
मध्य नागपुरातील जलालपुरा पोलिस ठाण्याजवळ रविवारी दुपारी तीन वाजता मध्य नागपूरच्या वॉर्ड समस्या निवारण समितीतर्फे निवडणुकीनिमित्त उमेदवार व नागरिकांना एकमेकांपुढे आणण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात कॉंग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्यासह वंचित आघाडीचे कमलेश भागवतकर, रमेश पुणेकर मंचावर उपस्थित होते. मध्य नागपूरचे भाजप उमेदवार विकास कुंभारे प्रचारात व्यस्त असल्यामुळे प्रतिनिधी म्हणून माजी मनपा सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी उपस्थित होते. याशिवाय परिसरातील नागरिक उमेदवारांना प्रश्‍न विचारण्यासाठी उपस्थित होते. 
नागरिकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी बंटी शेळके यांनी सुरुवात केली. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देत बंटी शेळके यांनी भाजपवर टीका केली. प्रचाराला जायचे असल्याने शेळके यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. यावर तिवारी यांनी आक्षेप घेतला. केलेल्या आरोपाचे उत्तर ऐकण्यापूर्वीच शेळके यांनी जाणे योग्य नसल्याचे नमूद करीत आयोजकांवर नाराजी व्यक्त केली. यानंतर वादाला सुरुवात झाली अन्‌ कॉंग्रेस व भाजप कार्यकर्ते एकमेकांवर धावून आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक केली. एकमेकांचा निषेध करीत शिवीगाळही केली. कार्यक्रमातील माईक फेकण्यात आले. संचालन करणाऱ्यानेही लपण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही बदडण्यात आले. एकूणच या प्रकारामुळे मध्य नागपुरात चांगलीच खळबळ माजली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT