blast of oxygen cylinder in primary health center of gondpipari in chandrapur 
विदर्भ

'पीएचसी'ची चौकशी करायला गेले, पण घडलं भलतंच, जावून बघताच ग्रामस्थांना बसला धक्का

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर पंचायत राज कमेटी आहे. जिल्ह्यातील विविध भागातील विभागांना भेट देऊन ते कारभाराची पाहणी करीत आहेत. ही टीम आज गोंडपिपरी दौऱ्यावर होती. कमेटीचे अध्यक्ष रायमुलकर हे आक्सापूर येथील पिएसचीमधील ऑक्सिजन सिलेंडरची तपासणी करीत होते. याचदरम्यान सिलेंडरचा पाईप निघला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.

पंचायत राजची संपूर्ण टीम सध्या चंद्रपूर जिल्ह्यात दौऱ्यावर आहे. आज ही टीम गोंडपिपरी तालुक्यात पोहोचली. टीमचे प्रमुख आमदार संजय रायमुलकर यांच्यासह संपूर्ण चमूने तालुक्यातील आक्सापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या केंद्राची पाहणी केल्यानंतर संजय रायमुलकर हे काही आरोग्यसेविकांना ऑक्सिजन सिंलेडरबाबत माहिती देत होते. याचदरम्यान सिलेंडरमधील पाईप निघाल्याने रायमुलकर जखमी झाले. त्यांच्या हाताला किरकोळ मार लागला. यावेळी त्यांच्यासोबत चमूसह जिल्ह्याचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डीले उपस्थित होते. 

...अन् ग्रामस्थ धावले - 
सिलेंडरचा पाईप निघाल्याने आवाज येताच आक्सापुरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रायमुलकर यांना झालेली जखम की किरकोळ स्वरूपाची असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. आक्सापूर येथे डॉ. तेलकापल्लीवार हे पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. पण ते एकही दिवस कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली. या तक्रारीची पंचायत राजच्या टीमने गंभीर दखल घेत चैकशी करून कारवाईचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT