Bobby-Sardar
Bobby-Sardar 
विदर्भ

भिशीच्या वादातून बॉबी सरदारचा ‘गेम’

सकाळवृत्तसेवा

नागपूर - मंजीत वाडे चालवित असलेल्या एक कोटी रुपयांच्या भिशीच्या वादातून बॉबी सरदार ऊर्फ भूपेंद्रसिंह माकन याचा ‘गेम’ करण्यात आला. एक कोटींची भिशी बॉबी सरदारने उचलल्यानंतर तो पैसे भरत नव्हता. त्या पैशाचा भार मंजीत वाडेवर आला होता. त्यामुळेच बॉबीचा खून करण्यात आल्याची चर्चा आहे. 

बॉबी सरदारचे अपहरण करून लिटील सरदार, मंजीत वाडे आणि त्याच्या तीन साथिदारांनी अपहरण केले. त्याचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर कोंढाळीत त्याचा मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी पहिल्याच दिवशी लिटील सरदार, मंजीत वाडे, हनी चंडोक यांना ताब्यात घेतले होते. मात्र, पोलिसांनी 
त्याला थातूरमातूर चौकशी करून सोडून दिले. शेवटी लिटील आणि मंजीत हेच हत्याकांडाचे मास्टरमाइंड निघाले. मंजीतला पोलिसांनी ‘सेटिंग’ करून फरार केल्याचा आरोपही होत आहे. मंजीतला अटक झाली असती तर कोट्यवधींचा भिशीचा व्यवसाय चौपट झाला असता. या भिशीत शहर पोलिस दलातील काही पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. भिशीच्या व्यवसायाची ‘सेटिंग’ लावण्यासाठी त्याला पोलिसांनीच वेळ दिल्याचे बोलले जाते. ती सेटिंग झाल्यावर मंजीतने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची चर्चा उत्तर नागपुरात सुरू आहे. यामुळे पोलिसांच्या तपासावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

चर्चित पोलिसांची मदत
ताजबागमधील ड्रग्ज तस्कर आबू खान प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असलेल्या काही चर्चित पोलिस कर्मचाऱ्यांची मदत गुन्हे शाखेने घेतली. त्यानंतर बॉबी हत्याकांडातील आरोपींची धरपकड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जे पोलिस कर्मचारी आरोपींशी मैत्री आणि अर्थपूर्ण संबंध ठेवत होते, त्याच पोलिसांनी बॉबी हत्याकांडातील आरोपींबाबत माहिती काढली. त्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचा सीडीआर काढल्यास त्या  कर्मचाऱ्यांचा बुरखा फाटू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT