file Photo
file Photo 
विदर्भ

मृतदेह ठेवला ग्रामपंचायतच्या आवारात 

सकाळ वृत्तसेवा

दवलामेटी (जि.नागपूर):  सुराबर्डीचे नागरिक बुधवारी अमरावती महामार्गावरील ग्रामपंचायतच्या आवारात एक मृतदेह घेऊन गेले. यावरून प्रशासनाची तारांबळ उडाली. आमच्या गावात स्मशानभूमी नाही, त्यामुळे आम्ही आज मृतदेह इथेच का जाळू नये, असा गावकऱ्यांनी हट्ट केला. ग्रामपंचायत प्रशासन व गावकऱ्यांत यावरून वाद निर्माण झाला. शेवटी ग्रामपंचायतने थातूरमातूर आश्‍वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आवारातून मृतदेह उचलला. 
सुराबर्डीच्या नागरिकांनी मृतदेह ग्रामपंचायतच्या आवारात आणून ठेवला. गावात स्मशानभूमी नसल्यामुळे मृतदेह जाळायचा कुठे, असा प्रश्‍न ग्रामपंचायत प्रशासनाला केला. उपसरपंच वनिता कापसे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी एक वर्षापूर्वी स्मशानभूमीसाठी भूमिपूजन झालेल्या शासकीय जागेवर मृतदेहाला अग्नी देण्यास गावकऱ्यांनी मान्य झाले. एक वर्षापूर्वी स्मशानभूमीचे भूमिपूजन होऊनसुद्धा आतापर्यंत बांधकाम का झाले नाही, असा प्रश्‍न करून गावकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले. 
माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य कमलेश मसराम यांनी दिलेल्या माहितीनुसार स्मशानभूमीतील शेड व सुरक्षाभिंतीसाठी एकूण दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत. परंतु, आतापर्यंत मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीच नसल्यामुळे ही वेळ आलेली आहे. 
कमलाकर मसराम, महेंद्र नौकरकार, अभय देवतळे, बालबुद्धे, अभिजित कचोरी, नरेश सोनुले, शरद कोहळे, उषाताई इखंनकार, सयाम सोनवणे, धनराज महादुले, वनिता कापसे, फजिती दमाहे, प्रमोद गुरुमुले, प्रमोद भोंडवे, सुधाकर गुरुनुले व समस्त नागरिक या प्रसंगी उपस्थित होते. 
स्मशानभूमीचे भूमिपूजन झालेल्या जागेवर काही धार्मिक संघटनांचा विरोध आहे. शेजारी असलेल्या बोरकर यांच्या शेतातील अनधिकृत ले-आउटमध्ये राहणाऱ्या लोकांनी स्मशानभूमीला विरोध केला आहे. म्हणून आतापर्यंत स्मशानभूमीचे काम लांबणीवर पडले. 
-वनिता कापसे 
उपसरपंच, सुराबर्डी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT