राजुरा (जि. चंद्रपूर) : आर्थिक अडचण आणि सततच्या मानसिक तणावातून चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील दोघांनी आपले जीवन संपविले. नीळकंठ निकोडे आणि गजानन कष्टी अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजुरा शहरालगत असलेल्या रामपूर येथील ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर कार्यरत नीलकंठ लक्ष्मण निकोडे (वय 45) यांनी राहत्या घरी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील काही दिवसांपासून नीलकंठ निकोडे मानसिक तणावात होते. रात्री कुटुंबीयांना त्यांनी अंगणात झोपत असल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळी अंगणात झोपले असताना पहाटे उठून त्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्यामागे एक मुलगा, एक मुलगी, पत्नी व आई असा आप्तपरिवर आहे.
राजुरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या चुनाळा येथील शेतकरी गजानन गोपाळा कष्टी (वय 35) यांनी आपल्या गोठ्यात सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. गजानन कष्टी यांच्या नावे चार एकर शेती असून, त्यांच्यावर सहकारी सेवा संस्थेचे ऐंशी हजार रुपये कर्ज होते. बियाण्यांची जुळवाजुळव करताना त्यांना आर्थिक अडचण निर्माण होत होती याच विवंचनेत सकाळी शेतात जाण्याच्या तयारीत असताना गोठ्यात कोणीही नसल्याचे पाहून कीटकनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. सायंकाळी काही कामानिमित्त गोठ्यात गेलेल्या व्यक्तीला गजानन मृतावस्थेत दिसून आला. सदर घटनेची माहिती गावात पसरताच आर्थिक विवंचनेत असलेल्या गजाननबद्दल चुनाळावासीयांनी हळहळ व्यक्त केली त्याच्या मागे पत्नी व दोन मुली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.