file photo
file photo 
विदर्भ

ब्रेकिंग : मेळघाटच्या कोरोनाबाधित डॉक्‍टरचा अकोल्यात मृत्यू...आरोग्य विभागाची वाढली चिंता

सकाळ वृत्तसेवा

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाटच्या आरोग्यवर्धिनी (सीएचओ) योजनेत कार्यरत एका 38 वर्षीय डॉक्‍टरचा त्यांच्या मूळ गावी अकोला येथे रविवारी (ता. 31) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने मेळघाटच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या डॉक्‍टरचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे स्पष्ट होताच मेळघाटातील डॉक्‍टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिखलदरा तालुक्‍यातील सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या तारुबांदा येथील आरोग्यकेंद्रात सीएचओ म्हणून ते कार्यरत होते. दोन मेपासून ते आरोग्यकेंद्रात आले नाहीत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

डॉक्‍टरला कोविड सेंटरची जबाबदारी

कोविड-19च्या पार्श्‍वभूमीवर बहुतेक सीएचओ डॉक्‍टरांना अमरावती येथे कोविड सेंटरची जबाबदारी देण्यात आली, त्यामध्ये या डॉक्‍टरचासुद्धा समावेश होता. मात्र ते कोविड सेंटरवर रुजू न होताच प्रकृती बिघडल्याने त्यांच्या मूळ गावी अकोला येथे निघून गेले होते.

अकोल्यात रुग्णालयात दाखल

तेव्हापासून आजपर्यंत ते रुजू झाले नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. अकोल्यात त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते तिथेच रुग्णालयात दाखल होते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

हेही वाचा : डोक्‍यात माजले संशयाचे काहूर, त्यातून घेतला हा टोकाचा निर्णय...

सखोल चौकशी सुरू
मेळघाटमध्ये कार्यरत असलेले, पण दोन मेपासून गैरहजर असलेल्या डॉक्‍टरचा कोरोनाने मृत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा मृत्यू मेळघाटमध्ये झाला नसून अकोला येथे झाला आहे. याबाबत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
- डॉ. फारुकी, आरोग्य उपसंचालक, अकोला.

दोन मेपासून गैरहजर
मेळघाटच्या एका उपकेंद्रात सीएचओ म्हणून कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या डॉक्‍टरवर अकोला येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली. डॉक्‍टर विनापरवानगी उपकेंद्रात दोन मेपासून गैरहजर होते.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT