The bride rode on horse during her wedding procession
The bride rode on horse during her wedding procession 
विदर्भ

नवरीची निघाली घोड्यावरून वरात

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : नवरदेवाप्रमाणे नवरीलाही वरातीत घोड्यावर बसण्याची इच्छा असते, परंतु बहुतांश मुली अशाप्रकारची इच्छा बोलूनच दाखवत नाही. परंतु, आता जग बदलतय, कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यास मुलीही अशाप्रकारचा आनंद उपभोगू शकतात.

मुलगा-मुलगी एकसमान याचा प्रत्यय दिग्रस येथे नुकताच आला. येथील गाडगे परिवारातील मुलगी नेहा रवींद्र गाडगे हिचा शुभविवाह वर्धा येथील कुणाल शिवपाल कडू यांच्याशी झाला. गाडगे परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नाची वरात घोड्यावर काढली.

यातून ‘मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी’ या म्हणीचा प्रत्यय आला. मुलीची घोड्यावर वरात काढून मुलगामुलगी एकसमान बोलूनच नाही तर कृतीतून साकारत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा संदेशही दिला.

त्याच बरोबर मुलीने वरातीमध्ये आजीआजोबा आणि इतर नातेवाइकांबरोबर नाचून नवरदेवाप्रमाणेच वरातीचा आनंद लुटला. मुलींनाही अशाप्रकारचा आनंद घेण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी घेतला पाहिजे, असा संदेशच जणू नेहाने दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीला दुसरा मोठा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT