brother assaults his sister at Yawatmal
brother assaults his sister at Yawatmal 
विदर्भ

आतेभावाचा मामे बहिणीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

उमरखेड (यवतमाळ) : नात्याने मामेबहीण लागत असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीवर आतेभावानेच अत्याचार केला. ही खळबळजनक घटना रविवारी (ता. 13) सायंकाळी तालुक्यातील चुरमुरा पार्डी येथे घडली. 

पाचवर्षीय मुलगी ही आजीसोबत चुरमुरा पार्डी येथे वास्तव्यास आहे. रविवारी सायंकाळी सातच्या दरम्यान आत्याकडे डाळभात देण्यासाठी आजीने मुलीला पाठविले. मुलीला जाऊन बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही. मुलगी घरी न आल्याने आजीची काळजी वाढली.

दरम्यान, शेजारच्या व्यक्तीने तुझी नात रक्ताने माखली आहे, असे सांगितले. मुलीला रडण्याबाबत विचारणा केली असता, जवळच्या टेकडीवर घडलेली घटना सांगितली. त्यामुळे आजीच्या जिवाचा तिळपापड झाला. पीडित मुलीच्या आजीने उमरखेड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून संशयित तरुणाविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेची वाच्यता होताच संशयित पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT