File photo 
विदर्भ

प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील मातामंदिर वॉर्डातील साक्षी शरद सुरकार (वय 17) या अल्पवयीन मुलीचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रिमडोह शिवारात द्वारकानगरीच्या मागे रविवारी (ता. 8) उघडकीस आली.
राष्ट्रीय महामार्गावरील रिमडोह शिवारात असलेल्या द्वारकानगरीच्या मागे सोमवारी सकाळी सात वाजता फिरायला गेलेल्या काही लोकांना मुलीची मृतदेह रक्ताने माखलेल्या स्थितीत आढळून आला. नागरिकांनी या घटनेची माहिती रिमडोह येथील पोलिस पाटील यांना दिली. रिमडोहच्या पोलिस पाटील कल्पना ऊईके यांनी याबाबत हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत पाटणकर, गुन्हे शोध पथकाचे सुनील पाऊल झाडे, रवी वानखेडे, नीलेश तेलरांधे, समीर कामडी, अमित नाईक, सचिन भारशंकर, उमेश बेले, गजू धर्मे आदींनी खुनातील आरोपीच्या शोध सुरू केला आहे.
त्यानंतर काही वेळातच नांदगाव येथील पंकज राजू तडस (वय 19) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने मुलीच्या खुनाची कबुली दिली. हा खून प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चा आहे. प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता विद्यापीठातही ‘अभियांत्रिकी’चे शिक्षण; ‘या’ ८ अभ्यासक्रमांना मंजुरी, २८० प्रवेश क्षमता, वाचा...

आजचे पंचांग २७ जून २०२६! शनिप्रदोष, शिवराज्याभिषेक दिन, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

SCROLL FOR NEXT