Buldhana news Due to chemical insecticide, 9 women in hospital 
विदर्भ

रासायनिक कीटकनाशकांमुळे 9 महिला शेतमजुरांना विषबाधा

विरेंद्रसिंग राजपूत

नांदुरा (बुलडाणा) : मका पिकाला कीटकनाशक देऊन घरी परतलेल्या ९ महिला शेतमजुरांना 'कार्बोमाईन' नावाच्या कीटकनाशकांचा पादुर्भाव झाल्याने विषबाधा झाली. त्यांना तात्काळ प्रा. आ. केंद्र नांदुरा येथे दाखल करण्यात आले. परंतु त्यांची गंभीर अवस्था पाहता नांदुरा येथील डॉ. जैस्वाल यांनी खामगाव येथील सामान्य रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठविले.

याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील रामपूर येथील काही शेतमजूर महिला गावातीलच एका शेतात मका या पिकाला लागलेल्या खोड किडीच्या प्रादुर्भावाला नष्ट करण्यासाठी या सर्व महिलांनी कार्बोमाईन नावाचे कीटकनाशक मका पिकाला हाताने टाकले. कीटकनाशक टाकल्यानंतर त्या महिला दुपारी कामावरून घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्यातील महिलांना मळमळ, उलटी, हातांना मुंग्या येणे, चक्कर येणे, अंधुक दिसणे सारखे लक्षणे दिसून आल्याने त्यांना प्रथम नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची गंभीर अवस्था पाहता त्यांना नांदुरा येथून रुग्णवाहिकेद्वारे खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

रामपूर येथील गंभीर असलेल्या ९ महिलांमध्ये ताईबाई चोपडे, मायावती दांडगे, ज्योती बेलोकार, पंचफुला दांडगे, शहनाज बी शे.हुसेन, राधाबाई लहाने, रुखमाबाई लोणकर, सईबाई कावरे व कल्पना बेलोकरचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO Successfully Tests: इस्रोची गगनयान मोहिमेसाठी यशस्वी इंटिग्रेटेड एअरड्रॉप चाचणी, चिनूक हेलिकॉप्टरने पाच टनाची कुपी सोडली

Chh. Sambhajinagar: सिडको खून प्रकरण, पालकमंत्री शिरसाट माघारी फिरताच एकाचे कृत्य; प्रमोदच्या काकूला धक्काबुक्की, कानशिलात लगावली

Healthy Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'बटाटा मटर ब्रेड कचोरी', सोपी आहे रेसिपी

Ajit Pawar: शेतकऱ्यांनी योग्य वेळी कर्जमाफी देऊ: उपमुख्यमंत्री अजित पवार; राष्‍ट्रवादीत अनिल देसाई दाखल, साताऱ्याच्या मातीशी आपुलकीची नाळ

Heavy Rain: देशभरात मुसळधार पाऊस; २४ तासांत १२ जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पूर

SCROLL FOR NEXT