Buldhana Women Agitation 
विदर्भ

बुलडाणा : बिअर बार बंद करण्यासाठी शेगावात एकवटल्या महिला !

बार समोर धरणेः विभागाच्‍या अधिकाऱ्यांविरोधात रोष

सकाळ वृत्तसेवा

शेगाव : शेगाव नगर परिषद हद्दीतील आळसणा रोडवरील मुस्लीम वसाहतीमध्ये धार्मिक स्थळाजवळ सुरु करण्यात आलेल्या श्रध्दा बिअरबार बंद करण्यासाठी शेगावात महिला एकवटल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात महिलांनी रोष व्यक्त करीत तीन दिवसात बार बंद न झाल्यास परिसरातील महिला समोरील रेल्वे रुळावर सामूहिक आत्मदहन करतील असा गर्भित इशारा यावेळी देण्यात आला.

शेगाव नगर परिषद हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या मुस्लीम वसाहतीमध्ये नुकतेच श्रध्दा बिअरबार सुरु केले आहे. मागील दहा वर्षापासून येथे मुस्लीम वसाहत असून, या परिसरात शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे आहेत. तसेच सदर वसाहतीमध्ये शांततामय वातावरण असतांना सुध्दा सदर बियर बार ला परवाना देतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थळाची कुठलीही पाहणी न करता आणि नगर पालिकेची या शिवाय पोलिस स्टेशनची परवानगी न घेता.

आर्थिक उलाढाल करून परवाना दिलेल्याचा आरोप वजा निवेदन १५ दिवसांपूर्वी देण्यात आले होते. मात्र, यावर कुठलीच कारवाई न झाल्याने आज रविवारी साईकृपा नगर, मिल्लत नगर, आजाद नगर, शांती नगर, बुरजे नगर, मुस्लिम सोसायटी, हेंड पाटील नगर या भागातील महिला एकवटल्याचे पाहावयास मिळाले. महिलांनी सकाळ पासून मिल्लत नगर भागात बियर बार परिसरात धरणे आंदोलन केले.

यावेळी ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वात दंगाकाबू पथकासह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मावळे धरणेस्थळी पोहचल्या नंतर महिलांनी त्यांच्यासमोर रोष व्यक्त करीत तीन दिवसात बार बंद न झाल्यास आणि गैरकायदेशीररित्या परवाना देणाऱ्यांविरोधात कारवाई न झल्यास महिला सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा यावेळी दिला.

यावर मावळे यांनी उद्या पर्यंत यासंदर्भात जिल्हाधिकारी आदेश करतील असे आश्वासन दिल्याने महिलांचा रोष कमी झाला. यावेळी या भागाचे माजी नगर सेवक दिनेश शिंदे समाज सेवक मो. इरफान गु.दस्तगीर यांनीही महिलांसोबत आपणही आत्मदहन करणार असल्याचा इशारा यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT