Monsoon-Session
Monsoon-Session 
विदर्भ

'जात चोरीचा धंदा' विधिमंडळात गाजला

सकाळवृत्तसेवा

आमदार टारफेंनी मांडला मुद्दा; गावात खळबळ
नागपूर, बुलडाणा - मोताळा तालुक्‍यातील तरोडा येथील शाळेत विद्यार्थ्यांची जात चोरल्याचा प्रकार "सकाळ'ने उघडकीस आणल्यानंतर सोमवारी कॉंग्रेसचे कळमनुरीचे आमदार संतोष टारफे यांनी माहितीच्या मुद्‌द्‌याच्या माध्यमातून ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली. अशा प्रकारांमुळे आदिवासींना पुन्हा जंगलात जावे लागेल, अशी खंत टारफे यांनी व्यक्त केली. दरम्यान, हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तरोडा गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी शाळा गाठून मुख्याध्यापकांना जाब विचारला.

जात चोरण्याच्या घटनेचा हवाला देत आमदार टारफे यांनी असे जात चोरीचे प्रकार राज्यभर घडत असून, राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली. या प्रकरणातील तथ्य पुढे आणण्यासाठी पत्र पाठवून चौकशी करण्याची मागणी केली जाईल, असे ते म्हणाले. तब्बल 1300 मुलांची मूळची "बंजारा' जात बदलून आदिवासींमधील "नायकडा' अशी नोंद करण्यात आली आहे. या शाळेत 250 "नायकडा' दाखला असलेली मुले शिक्षण घेत आहेत.

दुसरीकडे या वृत्ताचे पडसाद गावात उमटले. गावकऱ्यांनी मुख्याध्यापकांविरुद्ध रोष व्यक्त केला. आम्ही खरे आदिवासी आहोत. आम्ही कुठलीही जात बदललेली नाही, असे त्यांनी सांगितले. नायकडा जात आदिवासी प्रवर्गात मोडते. कुणाला जातीबाबत संशय असल्यास त्यांनी येथे येऊन चौकशी करावी, असे ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामस्थांच्या या भूमिकेनंतर मुख्याध्यापकांनी आदिवासी समाजाच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे स्पष्ट करीत नमती भूमिका घेतली. मुख्याध्यापकांनी चुकीचे मत प्रदर्शित केल्यामुळे गावकऱ्यांनी शाळा बंद आंदोलन करून त्यांचा निषेध केला. जबाबदार अधिकारी येऊन माफी मागेपर्यंत मुलांना शाळेत बसू देणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली. पंचायत समितीच्या शिक्षण सभापती उज्ज्वला चोपडे, जिल्हा परिषद सदस्य अनिल खाकरे, पंचायत समिती सदस्य प्रकाश बस्सी सरपंच स्वरूपसिंग येरवाळ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती गणेश बस्सी आदी या वेळी उपस्थित होते.

तरोडा गावातील परिस्थितीची माहिती मिळताच बोराखेडीचे ठाणेदार अविनाश भामरे सहकाऱ्यांसह तरोडा गावात दाखल झाले. प्राथमिक शिक्षणाधिकारी वराडे यांच्यासह पदाधिकारी व काही लोकप्रतिनिधी गावात पोचले. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती हाताळली व संतप्त गावकऱ्यांना शांत केले. सद्य:स्थितीत गावातील तणाव निवळला असून, सर्वत्र शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT