chain snatching at amaravati again
chain snatching at amaravati again  
विदर्भ

अमरावती शहरात साखळी चोरांचा धुमाकूळ; गेल्या महिनाभरात अनेक घटना 

संतोष ताकपिरे

अमरावती ः शहरात चेनस्नॅचरचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. एका महिलेची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी जबरीने हिसकावली. त्यानंतर दोघींची हिसकण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात दुचाकीस्वार यशस्वी होऊ शकले नाही.

शहरात भरदुपारी काही तासांच्या अंतराने राजापेठ, प्रशांतनगर बगीचासह शेगाव मार्गावर या घटना घडल्या. राजापेठ हद्दीत मालूनगरात एक महिला घरासमोरच्या झाडावर फुले तोडीत होती. महिला बेसावध असल्याचे बघून एका अनोळखी व्यक्तीने पाठीमागून येऊन गळ्यातील 16 ग्रॅम वजनाची 70 हजार रुपयांची सोनसाखळी जबरीने हिसकावून पळ काढला. 

दुचाकीवर दोघे पाठलाग करीत आले होते. त्यापैकी मागे बसलेला एकजण खाली उतरला, दुचाकीस्वार थोड्या अंतरावर दुचाकी सुरू करूनच थांबला होता. चेन हिसकल्यानंतर दोघेही पसार झाले. मंगळवारी (ता. आठ) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

त्यानंतर काही मिनिटांच्या फरकाने प्रशांतनगर बगीचा समोरून एक महिला रस्त्याने जात असताना दुचाकीस्वाराने तिच्याही गळ्यातील सोनसाखळी हिसकण्याचा प्रयत्न केला, परंतु महिला सावध असल्यामुळे तिची सोनसाखळी बचावली. सदर महिलेने पोलिसांना माहिती दिली. परंतु तक्रार नोंदविली नाही, असे फ्रेजरपुराचे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले. 

कठोरा मार्गावर सायंकाळी पोटे टाउनशीप मार्गावरही एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलिस घटनास्थळी पोहोचले, तशी नोंद घेतली. परंतु तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT