चंद्रपूर : अटकेतील दारूतस्करासह पोलिस कर्मचारी.
चंद्रपूर : अटकेतील दारूतस्करासह पोलिस कर्मचारी. 
विदर्भ

चंद्रपूर : नागपूरचा कॉलेजकुमार अडकला दारूतस्करीत

सकाळ वृत्तसेवा

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, ती पुरती फसली आहे. गावोगावी दारू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या व राज्याच्या सीमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्‍यातही दारूविक्री सुरू आहे. या दारूतस्करीत बडे आसामी गुंतले आहेत. आता कॉलेजकुमारांनाही या दारूतस्करीचे वेड लागले असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तीस हजारांची दारू जप्त केली. संबंधित कॉलेजकुमार आपल्या मित्रासह फरार असून याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

कारमध्ये तीन संशयित व्यक्ती
गोंडपिपरी येथील सांज्यो कॉन्व्हेंटजवळ रात्री सात वाजताच्या सुमारास एका आल्टो कारमध्ये तीन ते चार व्यक्ती संशयास्पदस्थितीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिस हवालदार विजयकुमार कोमल्ला सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यानंतर तिघे तेथून पसार झाले. मात्र, एकाला वाहनात पकडण्यात पोलिसांना यश आले. पकडलेल्या आरोपीचे नाव भूषण खोत असे आहे. तो नागपूरचा रहिवासी असून, गेल्या काही वर्षांपासून गोंडपिपरीत वास्तव्यास आहे.

तीस हजारांची दारू जप्त
पोलिसांनी घटनास्थळातून आल्टो कार जप्त केली. त्यात तीस हजार रुपये किमतीची देशी दारू आढळून आली. याप्रकरणी खोत याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपीपैकी एक आरोपी हा गोंडपिपरीचा रहिवासी आहे. तो नागपूरला शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. याप्रकारानंतर आता दारूतस्करीत कॉलेजकुमारांच्या सहभागाबाबत प्रचंड चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दारूतस्करीसाठी वापरलेले वाहन जप्त
फरार आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे करीत आहेत. दारूतस्करीसाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. पण ते वाहन नेमके कुणाचे आहे, याबाबत अद्यापही काही माहिती मिळू शकली नाही. मात्र, ही कार एका कर्मचाऱ्यांची असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT