Jatpura gate
Jatpura gate 
विदर्भ

Video : चंद्रपुरातील बाजारपेठ उघडणार, जिल्हातंर्गत वाहतुकीलाही परवानगी

सकाळवृत्तसेवा

चंद्रपूर :  कोरोना संसर्गामुळे पडलेला टाळेबंदीचा विळखा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सोमवारपासून (ता.११) सैल होणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळात सर्व प्रकारची व्यापारी प्रतिष्ठान सुरू करण्यासोबतच जिल्हातंर्गत वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मनपा, नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील प्रवासी ऑटो काही अटीशर्थीसह रस्त्यावर धावतील. पन्नास लोकांच्या उपस्थितीत आता लग्न समारभांना परवानगी दिली जाणार आहे. यामुळे मागील दीड महिन्यापासून घरात बंदिस्त असलेल्या जिल्हावासींचे जीवन पूर्ववत होण्यास मदत होईल. मात्र ‘सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या सूचना आणि आदेशाचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे.

टाळेबंदीतील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात केवळ जीवनावश्यक वस्तूंना परवानगी देण्यात आली. चंद्रपूर ऑरेंज झोनमध्ये असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यात टाळेबंदीत काही शिथिलता मीळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे टाळेबंदी ‘जैसे  थे ठेवण्यात आली. आता येत्या सोमवारपासून यात माठ्या प्रमाणात सूट दिली जाणार आहे.  जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकान सकाळी १० ते दुपारी २ या वेळात सोमवार ते शनिवार या काळात सुरू असतील. रविवारला केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकान सुरू राहील. 

सोबतच केशकर्तनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, येथे नागरिकांना स्वतःच टॉवेल आणावा लागेल. पन्नास व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नासाठी परवानगी दिली जाणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून ही परवानगी दिली जाईल. यासाठी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मीक कार्यक्रमाना मात्र बंदी आहे. जिल्ह्यातंर्गत वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही. मात्र, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य वाहतुकीसाठी परवानगी घ्यावी लागले. मालवाहतुकी ‘पासेस दिले जाणार आहे. मनपा, नगर पंचायत आणि नगर पालिकेच्या क्षेत्रात ऑटो चालकांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली. मात्र दोनपेक्षा जास्त व्यक्तींना ऑटोत बसविता येणार नाही. मास्क आणि सॅनिटायझर ऑटोत आवश्यक आहे. 

ऑटोचालकांना प्रवाशांच्या नोंदी ठेवणे अनिवार्य राहील.  या दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजे आहे. याची जबाबदारी संबंधित दुकानदारांवर राहील. अन्यथा कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळात फिरण्यास मनाई आहे. शिवाय ६५ वर्षांवरील व्यक्ती आणि १० वर्षाखालील बालकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घातला आहे. कोरोना रुग्ण सापडलेला कृष्णनगर परिसर प्रतिबंधात्मक करण्यात आला आहे. येथे कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. या क्षेत्रात टाळेबंदी ‘जैसे थे राहील.

हे बंदच राहणार
उपाहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, माल्स, सुपरमार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण, तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये, गुटखा-तंबाखू विक्री इत्यादी बंद राहील. सांस्कृतिक, धार्मिक क्रीडाविषयक प्रदर्शने व शिबिरे, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे आंदोलन यांना परवानगी नाही.

शहरात पॉझिटिव्ह रु़ग्ण आहे. या रुग्णांची दुसरी चाचणी निगेटीव्ह येईपर्यंत धोका टळला असे म्हणता येणार नाही. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.स्वत:ची आणि कुटुंबांची काळजी घ्यावी.
- डॉ.कुणाल खेमणार, जिल्ल्हाधिकारी, चंद्रपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT