विदर्भ

Chandrapur Accident : डिजेचे साहित्य खरेदी करून परततांना प्रसिद्ध डिजे वादकासह चौघांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली येथील डिजे संघटनेचे अध्यक्षांसह चार जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली- गडचिरोली मार्गावर बोलेरो ट्रकवर आदळून हा भीषण अपघात झाला आहे. चंद्रपूरहून डीजेशी संबंधित साहित्य खरेदी करून गडचिरोलीला परतताना हा अपघात झाला आहे. पंकज बागडे यांनी अल्पावधीत परिसरात त्यांच्या डीजे वादनाने लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पंकज किशोर बागडे (वय 26 रा. गडचिरोली), अनुप रमेश ताडूलवार (वय 35 रा. विहीरगाव ता.सावली), महेश्वरी अनुप ताडूलवार (वय 24 रा. विहीरगाव), मनोज अजय तीर्थगिरीवार (वय 29 रा. ताडगाव ता. भामरागड) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, या अपघातातून एक तरुण थोडक्यात बचावला आहे. मात्र आपल्यासोबत असेलल्या इतर चौघांच्या मृत्यूने या तरुणालाही मोठा धक्का बसला आहे. रस्त्यावर बसलेल्या गाईला वाचवता अचानाक बोलेरा गाडीचा स्टेअरिंग रॉड तुटला आणि गाडी ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये पंकज बागडे यांच्यासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

Pune Nashik Highway Accident: पुणे-नाशिक मार्गावर कंटेनर-ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, एकलहरे येथे वाहतूक कोंडी!

SCROLL FOR NEXT