file photo
file photo 
विदर्भ

पशुवैद्यकीय चिकित्सालयांचा अनागोंदी कारभार

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा (जि.नागपूर): तालुक्‍यात पशुधनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या अखत्यारीतील 11 दवाखाने कार्यरत आहेत. यातील सहा दवाखान्यांत पशुधन पर्यवेक्षक नाही. यामुळे 97 गावांतील जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या अनागोंदी कारभारामुळे पशुपालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
हिंगणा तालुक्‍यांमध्ये 156 गावे आहेत. औद्योगिक तालुका असतानाही शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुधन मोठ्या प्रमाणात पशुपालक पाळतात. पूर्वी पशुपालक कुटुंबांची संख्या 56 हजार होती. सद्यःस्थितीत ही संख्या 66 हजारांच्या घरात पोहोचली आहे. शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात तालुक्‍यात वाढत आहे. मदर डेअरी प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशा परिस्थितीत पशुधनाचे आरोग्य सांभाळणे ही पशुपालकांना तारेवरची कसरत आहे. पशुधनाच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे 5 व राज्य शासनस्तरीय 6 असे एकूण 11 पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हा परिषदेचे दवाखाने चालवले जातात. राज्य शासनस्तरीय दवाखाने जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या अखत्यारित आहेत. राज्य शासनस्तरीय किन्ही धानोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक म्हणून डॉ. वैद्य कार्यरत आहेत. उर्वरित मोहगाव झिल्पी, आमगाव, देवळी, टाकळघाट, कान्होलीबारा, कडेगाव येथील पशुधन पर्यवेक्षकाची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखाण्यात हिंगणा, गुमगाव, हळदगाव, जवळा येथे पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. कवडस येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहायक पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. रिक्त पदांचा अनुशेष मागील अनेक वर्षांपासून आहे. रिक्त असलेली पदे भरण्याकरिता कुठलीही उपाययोजना केली नाही. या कारणामुळे 97 गावांतील जनावरांच्या उपचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जनावरांच्या आरोग्यासंबंधी प्रशासनही उदासीन असल्याचे दिसून येत आहे. पशुधन पर्यवेक्षकाची रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई होणे गरजेचे आहे. पशुपालकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून काय कारवाई होते, हे येणारा काळच सांगेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT