child  e sakal
विदर्भ

प्रसूती होताच बाळाचा मृत्यू, डॉक्टरांच्या हातातून बाळ पडल्याचा मातेचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

जेवनाळा (जि. भंडारा) : जिल्ह्यातील पालांदूर (palandur bhandara) येथे ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

गरोदर माता दुर्गा रवी उरकुडे यांना प्रसूतीसाठी २१ तारखेला ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे भरती करण्यात आले. परंतु, येथील डॉक्टरांनी तिला भरती करून घेतले नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी पहाटे चार वाजता भरती करण्यात आले. १२ वाजताच्या दरम्यान बाळाचा जन्म झाला. परंतु, बाळ मृत असल्याचे समजले. मात्र, बाळाच्या आईच्या सांगण्यानुसार प्रसूती झाली तेव्हा बाळ जिवंत होते. त्याला साफ करताना डॉक्टरांच्या हातातून बाळ जवळ ठेवलेल्या ट्रे मध्ये पडले. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात योग्यता धारक डॉक्टरांची नेमणूक केलेली असते. या प्रकरणाची चौकशी करून दोषी डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी उरकुडे कुटुंबीयांनी केली आहे.

मला पहाटे ४ वाजता पोटात दुखणे वाढल्याने ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रसूती झाली तेव्हा बाळ जिवंत होते. परंतु, काही वेळाने डॉक्टरांच्या हातातून बाळ जवळच्या ट्रे मध्ये पडल्याने बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरच माझ्या बाळाचे मारेकरी आहेत.
-दुर्गा उरकुडे, माता.

दरम्यान, डॉक्टरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT