devendra.jpg
devendra.jpg 
विदर्भ

अजित पवारांसोबत शपथ घेतल्याने फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अनेक दिवसांपासून सरकार स्थापन होत नव्हते. या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारी अखेर सत्ता संघर्षाचा पेच सुटला आहे. शनिवारी राजभवनामध्ये सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, खासदारकीच्या निवडणुकीवेळी मी केव्हाच राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, राष्ट्रवादी हा भ्रष्ठवादी असून आम्ही केव्हाही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, जाणार नाही, जाणार नाही असे वाक्य फडणवीस या व्हिडीओत उच्चारताना दिसत आहेत. पण आज घडलेल्या शपथ विधीच्या घडामोडींमु्ळे हा व्हिडीओ सोशल मिडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे. 

आज फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. यावर विविध नेते प्रतिक्रीया देत आहेत. ज्य़ेष्ठ नेते शरद पवार यांनी हा आपला व पक्षाचा हा निर्णय नसून हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय आहे. यावर रोहित पवार यांनी आम्ही पवार साहेब यांच्यासोबत आहोत असे सांगितले आहे. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन्ही मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन केल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. तर अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. असं शरद पवारांनी ट्विट केलं आहे. दरम्यान या राजकीय घडामोडींवर दुपारी 12 वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

आम्ही स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे, 'सिल्व्हर ओक'वरही अजित पवार यांचा राग नेमका याचसाठी होता का? असा सवालही उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी पहिल्या दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीच्या सरकारला विरोध होता. त्यात धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही फारसे अनुकूल नव्हते, अशी माहिती समोर येत आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT