आनंदराव गेडाम
आनंदराव गेडाम  
विदर्भ

कॉंग्रेस उमेदवार आनंदराव गेडाम यांच्या समस्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा

आरमोरी (जि. गडचिरोली) : कॉंग्रेसचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार आनंदराव गेडाम यांना अपक्ष उमेदवार बग्गूजी ताडाम यांचे अपहरण प्रकरण भोवणार आहे. या प्रकरणी फरार असलेले गेडाम यांचा जामीन मंगळवारी (ता. 15) जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला.
गेडाम व त्यांच्या मुलासह 13 जणांवर अपहरणाचा गुन्हा आरमोरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गेडाम यांच्यासह सर्वजण फरार झाले आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार बग्गूजी ताडाम आपल्या तीन साथीदारांसह बुधवारी (ता. 9) रात्री सुकाळा येथून नाटकाच्या उद्‌घाटनानंतर घरी परत येत होते. दरम्यान, गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स व त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून वैरागड-मानापूर फाट्यावर ताडाम यांची गाडी अडवून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर ताडाम व त्यांच्या साथीदारांना रात्री सलंगटोला येथे थांबवण्यात आले. त्याठिकाणी आनंदराव गेडाम उपस्थित होते. त्यांनी ताडाम यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच प्रचारातून माघार घेण्याची धमकी दिली. यावेळी ताडाम यांनी गोंडी भाषेत कुटुंबीयांना मोबाईलवर आपले अपहरण झाल्याची माहिती दिली. यानंतर त्यांची सुटका झाली. ताडाम व सहकाऱ्यांनी गुरुवारी रात्री आरमोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स गेडाम यांच्यासह पंकज तुलावी, जीवन नाट आणि इतर अशा एकूण 11 जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने फरार असलेले गेडाम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT