ATM Machine 
विदर्भ

'एटीएम' मशीनशी संपर्क धोकादायक, ग्राहकांची सुरक्षा वाऱ्यावर; केवळ बॅंकांतील उपाययोजनांवर भर

सूरज पाटील

यवतमाळ : कोरोनाचा ग्रामीण व शहरी भागात वाढत चाललेला शिरकाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, एटीएमकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांचा एटीएम मशीनशी थेट संपर्क येत आहे. सॅनिटायझरअभावी एटीएममधून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती सतावत आहे.

शहरी व ग्रामीण भागातील बहुतांश एटीएममध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठलीच व्यवस्थाच केलेली दिसून येत नाही. सुरक्षारक्षक नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढतच आहे. जनतेला खबरदारी बाळगण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. कोरोनाच्या भीतीने सामान्य नागरिकही स्वतःची पुरेपूर काळजी घेत असल्याचे दिसून येते. मात्र, दररोज शेकडो ग्राहकांचा स्पर्श होणाऱ्या एटीएम केंद्राचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

सणाच्या पाश्वभूमीवर ग्राहक बॅंकेत जाऊन पैसे काढण्याऐवजी एटीएम मशीनवरच गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रीयीकृतसह खासगी बॅंकांचे शहरातील प्रत्येक चौकांत एटीएम केंद्रे आहेत. बॅंकांमध्ये ग्राहकांना प्रवेश देण्यापूर्वी तापमान मोजमाप व सॅनिटायझर देऊन आत सोडले जाते. गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना बॅंकेबाहेर उभे करून टप्प्याटप्प्याने आत सोडले जाते.

बॅंकांत सर्व प्रकारे काळजी घेतली जात असताना एटीएममधील ग्राहकांची सुरक्षा मात्र, वाऱ्यावर आहे. एटीएम बाहेर सुरक्षारक्षक राहत नसल्याने ग्राहक मास्कविनाच आत जातात. दिवसभरात शेकडो ग्राहकांच्या हातांचा स्पर्श या मशीनला होतो. असाच प्रकार सुरू राहिल्यास एटीएम केंद्रातून कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. प्रामाणिकपणे नियमांचे पालन करणारे ग्राहक या कारभारामुळे नाराजी व्यक्त करीत आहेत.

स्वच्छतेचा अभाव... 

एटीएम केंद्रात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. एटीएममधून पैसे काढल्यावर काही ग्राहक हातातील स्लीप खाली फेकून देतात. नियमित स्वच्छता होत नसल्याने आतमध्ये धुळ साचलेली राहते. याकडे बॅंक प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

जिल्हा प्रशासनाची डोळेझाक कशी?

कोरोनापासून बचाव करण्याच्या सूचना प्रशासनाद्वारे सामान्य नागरिक व कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. बॅंकेत उपाययोजना करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे एटीएम केंद्राला अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आलेले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाची डोळेझाक कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

SCROLL FOR NEXT