file photo
file photo 
विदर्भ

कोरोना इफेक्‍ट : कापसाची खरेदी 53 लाख क्‍विंटलवरच, बळीराजा चिंतित

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : पणन महासंघाकडून खरेदी करण्यात आलेला कापूस सध्या जिनिंगमध्ये पडून आहे. जिनिंगही बंद असल्याने त्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने हा कापूस सांभाळण्याची जबाबदारी जिनिंगमालकांवर आली आहे. आता या कापसाचे काय करावे, असा प्रश्‍न जिनिंगमालकांना पडला आहे.

राज्यात पणन महासंघाकडून आतापर्यंत 140 केंद्रांवर कापूस खरेदी करण्यात आली. यातही कधी दरवाढ आणि कधी दर पडण्याचा प्रकार सुरू होता. यामुळे बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस घरीच ठेवला होता.

उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर

कोरोना इफेक्‍टमुळे सध्या शासकीय आणि खासगी कापूस खरेदी बंद झाली आहे. खरेदी पुन्हा केव्हा सुरू होईल, याचा नेम नसल्याने खुद्द पणन महासंघ आणि कापूस उत्पादक शेतकरी सध्या विचारात पडले आहे. कापूस खरेदीचे पैसेच जर शेतकऱ्यांना मिळत नसेल तर त्यांची उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

शेतकऱ्यांमध्ये धडकी

सध्या अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल घरी आहे. आता खरेदी बंद झाल्याने या शेतमालाची राखण कशी करावी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. अशास्थितीत शेतमालाची चोरी होण्यासह कापसाला आग लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT