file photo
file photo 
विदर्भ

कोरोना : "घरवापसी"त आरोग्य तपासणी बंधनकारक ! 

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबई व अन्य रेड झोनमधील नागरिक, कामगार, विद्यार्थी परतायला सुरवात झाली आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आरोग्य तपासणी करणे, होम क्वारेटाइन होणे आवश्‍यक आहे. चंद्रपूर शहरात 2 मे व 13 मे रोजी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या दोन पॉझिटिव्ह नागरिकांशिवाय अन्य कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण अद्याप शहरात नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

कृष्णनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2 मे रोजी आढळलेल्या कृष्णनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. सध्या रुग्णावर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचार सुरू आहेत. कृष्णनगर येथील कंटेनमेंट झोनला 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे या परिसराचे 14 दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सध्या सर्वेक्षण बंद आहे. 13 मे रोजी आढळलेल्या बिनबागेट परिसरातील रुग्णाची प्रकृती स्थिर असून रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे. रुग्णाच्या संपर्कातील सर्वच 7 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. या परिसरात 4 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 

427 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह 

जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये आतापर्यंत 482 नागरिकांचे नमुने घेण्यात आले आहेत. यापैकी 2 नागरिक पॉझिटिव्ह असून, 427 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आहेत, तर 53 नागरिकांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिक परत येत आहेत. या प्रत्येकाने आपली आरोग्य तपासणी करणे आवश्‍यक आहे. चंद्रपूर शहरामध्ये शकुंतला लॉन या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नोंद व तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या अन्य तालुक्‍यांच्या ठिकाणी बसस्थानक परिसरात ही आरोग्य तपासणी व नोंदणी सुरू आहे. 

14 हजार 554 नागरिकांचे गृहविलगीकरण 

जिल्ह्यात 1 हजार 73 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी तालुकास्तरावर 875 नागरिक, तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 198 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहे. तसेच गृहअलगीकरण करण्यात आलेल्या एकूण नागरिकांची संख्या 49 हजार 478 आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 14 हजार 554 नागरिक गृहअलगीकरण प्रक्रियेत आहे.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयारी होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

Accident News : पुण्यात कल्याणीनगर येथे भीषण अपघात, दोघांना चिरडले,अल्पवयीन कारचालक ताब्यात

Sharmistha Raut : "माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायचे"; घटस्फोटाच्या त्या प्रसंगावर व्यक्त झाली शर्मिष्ठा

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT