file photo
file photo 
विदर्भ

भयंकर! कोरोना निगेटिव्ह झाल्यानंतरही महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : जिल्ह्यात मागील महिन्यात पहिली कोरोनाबाधित आढळलेली व उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या महिलेचा नागपूर येथे बुधवारी (ता. 27) घरीच मृत्यू झाला. या महिलेला क्षयरोगाच्या उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले होते.

नागपूर येथील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय महिलेला क्षयरोग झाला होता. त्यावर उपचारासाठी ती भंडारा तालुक्‍यातील गराडा येथे आपल्या भावाकडे आली होती. जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्षयरोग कक्षात तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, तिला सुटी झाल्याने गावी गेली. याच सुमारास जिल्हाबंदी करण्यात आल्यामुळे तिला नागपूरला परत जाता आले नाही.

पहिली कोरोनाबाधित रुग्ण

पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधोपचार सुरू असताना प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान कोरोना व सारी संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. या महिलेचा नमुना 23 एप्रिलला प्रयोगशाळेत पाठविला होता. त्याचा अहवाल 27 एप्रिलला प्राप्त झाल्यावर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. ही जिल्ह्यातील पहिली कोरोनाबाधित रुग्ण ठरली होती.

क्षयरोग असल्याने नागपुरात हलविले

त्यानंतर जिल्हा प्रशासनाद्वारे खबरदारीचा उपाय म्हणून गराडा-मेंढा येथे कंटेन्मेंट झोन जाहीर केले होते. या महिलेवर कोविड रुग्णालयात उपचार केल्यानंतर 14 दिवसांनी तिचे दोन नमुने निगेटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. दरम्यान, 26 मे रोजी श्‍वसनाचा त्रास होत असल्याने तिला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना तिच्या कुटुंबीयांनी आपल्या जबाबदारीवर गौतमनगर येथील घरी नेले. परंतु बुधवारी (ता. 27) रात्री प्रकृती बिघडून तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय महाविद्यालयात उपचारात दुर्लक्ष झाल्याने कुटुंबीयांनी तिला दुचाकीने घरी नेले, अशी माहिती मृताच्या नातेवाईकाने दिली.

श्‍वसनाचा होता त्रास

कोरोनामुक्त झाल्यावर आरोग्य व जिल्हा प्रशासनाने महिला क्षयरोगातूनही बरी झाली; तरीही खबरदारीच्या दृष्टिकोनातून तिच्यावर क्षयरोग विभागात उपचार सुरू राहतील, असे सांगितले होते. मात्र, नंतर श्‍वसनाचा त्रास झाल्याने तिला नागपूर येथे हलवावे लागले. कोरोनामुक्त झाल्यानंतर पुढच्या हालचालीबाबत मात्र, कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. अशातच तिचा मृत्यू झाला. यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

मृत्यूचे कारण शोधण्यासाठी समिती
महिला रुग्ण कोरोनामुक्त झाली होती. परंतु तिला क्षयरोग आजार कायम होता. तिला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने नागपूरला हलविण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी समिती चौकशी करीत आहे. लवकरच अहवाल प्राप्त होईल.
- डॉ. प्रशांत उईके
जिल्हा क्षयरोग अधिकारी, भंडारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT