सकाळी फिरणाऱ्या नागरिकांना देतो दर्शन; मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून लपतो...

citizens saw chital in the premises of VNIT
citizens saw chital in the premises of VNIT

नागपूर : टाळेबंदीमुळे वन्यप्राण्यांचे ग्रामीण भागातच नव्हे तर चक्क उपराजधानीतील बजाजनगरापर्यंत दर्शन होऊ लागले आहेत. शुक्रवारी सकाळी विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेत (व्हीएनआयटी) चितळाचे दर्शन झाल्याने सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांना सुखद धक्का बसला. 

मागील आठवड्यात राज्याचे वन विभागाचे मुख्यालय असलेल्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात मसन्याऊद हा प्राणी दिसला होता. व्हीएनआयटीच्या परिसरात मोरांचा मुक्तसंचार अनेकदा अनुभवलेल्यांना चितळाचे दर्शन झाले. एका वन्यजीवप्रेमीने वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे चितळाचे काढलेले छायाचित्र पाठविल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने परिसराची पाहणी केली. मात्र, त्यांना चितळ दिसला नसला तरी सलग दोन दिवसांपासून सकाळी फिरणाऱ्या नागरिकांना तो दिसत असल्याची माहिती पुढे आली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा सकारात्मक पैलू म्हणून वन्यजीवांच्या मुक्त संचाराचे प्रमाण वाढू लागले आहेत. शहराच्या आजूबाजूला अंबाझरी जैवविविधता उद्यान, व्हीएनआयटी, पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या शेती, वायू सेनेचे खुली मैदाने आहेत. त्यामध्ये अनेकदा मोरांचे दर्शन होत असते. जानेवारी महिन्यात अंबाझरी जैवविविधता उद्यानात बिबटचे दर्शन झाले होते. टाळेबंदीत हिंगणा वनपरिक्षेत्रात नीलगाय एका घरात घुसली होती. 

नरांनाच असतात शिंगे

चितळ हे भारतात सर्वाधिक आढळणारे हरीण आहे. हे हरीण अतिशय सुंदर असून विटकरी रंग व त्यावरील पांढरे टिपके यावरून हे हरीण सहज ओळखू येते. चितळ हे हरीण हरणांच्या सारंग कुळातील असून त्यांच्या नरांनाच शिंगे असतात. तसेच शिंगे ही भरीव असून ती दरवर्षी उगवतात व गळून पडतात. चितळाच्या मादीला शिंगे नसतात.

वनकर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले
चितळांचा वावर मुख्यत्वे भारतातील सर्व कमी दाट ते अतिशय घनदाट जंगलात आहे. मध्य भारतातील जंगलात चितळांची संख्या लक्षणीय आहे. नागपूर शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जंगल असून, त्यातही चितळाचे अस्तित्व आहे. व्हीएनआयटीमध्ये चितळ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनकर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले होते. मात्र, दिसला नाही. त्याकडे वन विभागाची नजर आहे. 
- बी. सी. गंगावणे, 
वनपरिक्षेत्र अधिकारी, सेमिनरी हिल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com