corona positive woman dies in Yavatmal district
corona positive woman dies in Yavatmal district 
विदर्भ

कोरोना ब्रेकिंग : यवतमाळ जिल्ह्यात बाधित महिलेचा मृत्यू, पाच पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शुक्रवारी केळापूर येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यूची संख्या 10 झाली. तर जिल्ह्यात पाच जण नव्याने पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व उपचाराअंती "पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या सहा जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 155 रिपोर्ट प्राप्त झाले. यात सहा पॉझेटिव्ह, 148 निगेटिव्ह आणि एका रिपोर्टचे अचूक निदान झाले नाही. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये केळापूर येथील मृत महिलेचा समावेश आहे. तर उर्वरित पाच जणांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष आहेत. यात यवतमाळ शहरातील एक महिला, एक पुरुष तर नेर येथील दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे.

गुरुवारी जिल्ह्यात ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 63 होती. यात सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने ही संख्या 69 वर पोहचली. मात्र, एका पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्याने हा आकडा 68 वर आला. त्यातच आज (दि.3) सहा जण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 62 आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 304 वर पोहचली आहे. यापैकी तब्बल 232 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर जिल्ह्यात दहा कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयासोलेशन वार्डात सद्यस्थितीत 84 जण भरती आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत 5213 नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले. यापैकी 5137 प्राप्त तर 76 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4833 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT