Coronavirus end in August 
विदर्भ

... तर ऑगस्ट महिन्यात होईल 'कोरोना'चा नाश!, काय आहे गणितीय 'एक्‍स्पोनेंशियल' पद्धत?

सूरज पाटील

यवतमाळ : कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन एका योद्‌ध्याप्रमाणे लढा देत आहेत. भविष्यात कोवीड-19ची रुग्णसंख्या किती राहील, हा आकडा किती पटीने वाढणार, याची आकडेमोड यवतमाळ येथील दोन तरुणांनी गणितीय "एक्‍स्पोनेंशियल' पद्धतीचा आधार घेत काढली आहे. कोराना विषाणूचा आकडा वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे सावट आहे. या विषाणूला पराभूत करण्यासाठी "लॉकडाउन' हाच प्रभावी एकमेव उपाय असल्याचे या अभ्यासक तरुणांचे म्हणणे आहे. अनिकेत रवींद्र इंगोले (सायंटिस्ट ऍण्ड रिसर्चर) व सुवेध सुनील भेले (इन्होवेटर) अशी गणितीय फॉर्म्युला तयार करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. 

"एक्‍स्पोनेंशियल मेथड'चा आधार घेत त्या दोघांनी ग्रोथ फॅक्‍टर मॉडिफाय केले. दिलेल्या संख्येत कशी वाढ होते हे माहित पडते. अनिकेत व सुवेध यांनी गणित तज्ज्ञ लतिफ तगाले यांच्या मार्गदर्शनात फेब्रुवारीपासूनची आकडेवारी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, लॉकडाउनचे नियम लक्षात घेऊन अभ्यास केला. लॉकडाउनचे आदेश नसते तर कोरोना पॉझिटिव्हचा आकडा आपल्या विचार क्षमतेच्या पलिकडे गेला असता. मात्र, रुग्ण दुप्पट होण्याची भीती काही प्रमाणात कमी झाली आहे.

लस निर्माण होत नाही तोपर्यंत लॉकडाउन हेच शस्त्र आहे. 24 एप्रिलला एक गणित केले होते. 28 तारखेला किती रुग्ण राहतील, हा आकडा काढला होता. त्यांची आकडेवारी 31 हजार 705 आली होती. तर आज सेतू ऍपवर 31,332 माहिती अपलोड झाली आहे. "एक्‍स्पोनेंशियल मेथड'मध्ये केवळ 373 रुग्णांचा फरक पडला आहे. 30 मे रोजी तरुणांचे गणित 36 हजार 332 होते. तर सेतू ऍपवर ते 35,520 आकडेवारी अपलोड झाली आहे. आपण नियोजन आणि नियंत्रणासाठी तयार असायला पाहिजे, हा गणितीय मेथड तयार करण्यामागील उद्देश आहे. 

'लॉकडाउन' असल्यास आकडेवारी   
महिना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 
मे  54,518
जून 62,577
जुलै 66,438
ऑगस्ट निगेटिव्ह

98 टक्के आकडेवारी ही बरोबर 
कोरोना विषाणुमुळे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाबींवर परिणाम होणार आहे. सध्या सर्वच यंत्रणा जीव धोक्‍यात टाकून कर्तव्य बजावत आहेत. गणितीय ग्रोथ मेथड फॉर्म्यूला आहे. दोघांनी माझ्या मार्गदर्शनात रिसर्च केले आहे. त्यानुसार 98 टक्के आकडेवारी ही बरोबर येते. 
- लतिफ तगाले, 
गणित तज्ज्ञ, यवतमाळ

"के' हा वाढ फॅक्‍टर
एक्‍सपोन्सियल इंक्रीज मेथड हा गणिताचा फॉर्मूला वापरून "कोविड-19'ची रुग्ण संख्या काढण्यात आली. हा फार्मूला जशाचा तसा आपण वापरू शकत नाही. त्यात "के'मध्ये बदल करावे लागतात. "के' हा वाढ फॅक्‍टर आहे. त्याचा अंक आपण फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान "कोविड-19'ची रुग्ण संख्या लक्षात घेऊन काढली. 
- अनिकेत इंगोले, 
सायंटिस्ट ऍण्ड रिसर्चर, यवतमाळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rains Chaos: एका पावसात महाराष्ट्र ठप्प, १२ वर्षांचा हिशेब कोण देणार? सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर पर्यावरण व पायाभूत सुविधांबाबत जोरदार निशाणा

Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT