विदर्भ

नगरपंचायत कार्यालयाच्या गेटसमोरच दिला मृतदेहाला विसावा

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : अगदीच नगरपंचायत कार्यालयाला लागून असलेल्या बौद्ध स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पावसामुळे खचल्याने नागरिकांना मृत्यूदेहाची अंत्ययात्रा नगरपंचायतीच्या आतील परिसरातून न्यावी लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी चक्क कार्यालयाच्या गेटसमोर मृत्यूदेहाला विसावा देऊन आक्रोश व्यक्त केला. नगरपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर पुलाचे काम करावे अशी मागणी सुद्धा अंत्ययात्रेत उपस्थित नागरिकांनी केली.

जिल्ह्यातील अनेक भागात काही दिवस मुसळधार पावसाने कहर केल्याने घराची पडझड होऊन नुकसान झाल्याची नोद आहे. शेतीचे, गावातील लहान मोठ्या पुलाचे, रपट्याचे देखील मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नुकसान झाले. दहा ते बारा दिवसांपासून नगरपंचायतीला लागून गेलेल्या मोठ्या नाल्यावरील रपटा खचल्याने स्मशानभूमीत जाणारा रस्ता बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मृत्यूदेह फिरून नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरातून न्यावा लागत आहे.

नरेंद्र किसन मकेश्वर (वय ६७) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा नगरपंचायतीच्या परिसरातून घेऊन जात असताना चक्क कार्यालयाच्या गेट पुढेच मृत्यूदेहाला विसावा देऊन नागरिकांनी खचलेल्या पुलाच्या कामाचा निषेध व्यक्त करीत आक्रोश दाखविला. स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या भावनेचा अंत पाहू नये असा इशारा अंत्ययात्रेत उपस्थित असलेला नागरिकांनी दिला. त्यामुळे स्मशानभूमीच्या पुलाचा प्रश्न तीव्र होण्याच्या मार्गावर असल्याचे या आक्रोशातून दिसून आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनाअंतर्गत सदर काम टेंडर प्रक्रियेच्या मार्गावर आहे. काही दिवसांत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन कामाची वर्कऑर्डर देण्यात येईल. हा पूल तिवसा शहरातील जनतेच्या सेवेत पुन्हा सुरू होणार आहे.
- डॉ. पल्लवी सोटे, मुख्याधिकारी न. पं., तिवसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT