विदर्भ

कापूस पणन महासंघ ठरतोय ‘पांढरा हत्ती’

मनोज भिवगडे

अकोला - सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावाच्या तुलनेत बाजारभाव अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पणन महासंघाला कापूस देणे बंद केले. सात वर्षांपासून एक बोंडही स्वबळावर कापसाची खरेदी करू न शकलेल्या कापूस पणन महासंघाच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वेतनावर मात्र खर्च सुरूच आहे. परिणामी महासंघाचा तोटा पाच हजार कोटी रुपयांवर गेल्याने कापूस पणन महासंघ ‘पांढरा हत्ती’ ठरू लागला आहे. 

राज्यात कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी कापूस एकाधिकारशाही सुरू झाली. कापूस पणन महासंघाच्या माध्यमातून कापूस खरेदी केला जाऊ लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दाम मिळू लागले. मात्र, काळासोबत बाजारभावाच्या तुलनेत पणन महासंघाकडून शेतकऱ्यांना मिळणारे दर कमी झाले. परिणामी सात वर्षांपासून पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. खासगीतच शेतकरी त्यांचा कापूस विकून चांगले दर मिळवू लागले. त्यामुळे कापूस पणन महासंघ केवळ नावालाच उरला आहे.

‘सीसीआय’चे एजंट
राज्यात केंद्र सरकारची एजन्सी म्हणून ‘सीसीआय’तर्फे कापूस खरेदी केला जातो. सरकारच्या हमीभावाप्रमाणे कापूस खरेदी केंद्र सुरू करताना ‘सीसीआय’ कापूस पणन महासंघाला एजंट म्हणून नियुक्त करते. त्यासाठी त्यांना ‘सीसीआय’कडून कमिशन दिले जाते. या कमिशनवरच कापूस पणन महासंघाचा कारभार सुरू आहे.

राज्य सरकारकडून तूर व सोयाबीनसह मूग- उडीद खरेदीवर खरेदी व विक्री संघ किंवा ‘नाफेड’ला कमिशन देते. त्याचप्रमाणे कापूस खरेदीसाठी पणन महासंघाला सरकारकडून कमिशन मिळाल्यास पाच हजार कोटींवर असलेला तोटा कमी होऊन पणन महासंघ आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि ‘कापूस ते कापड’ हा पणन महासंघाचा उद्देशही साध्य होईल. प्रसन्नजित पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ

वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च
कापूस पणन महासंघाचा कारभार पाहण्यासाठी वेतन व मानधनावर ४२०० पेक्षा अधिक कर्मचारी राज्यभरात नियुक्त करण्यात आले होते. काळासोबत कर्मचाऱ्यांची संख्या घटत गेली. आता २५० कर्मचारी शिल्लक आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांवर होणारा खर्चही कापूस पणन महासंघालाच करावा लागत आहे. सरकारकडून एक पैसाही दिला जात नाही. कापूस पणन महासंघाकडून सात वर्षांपासून प्रत्यक्षात एक बोंडही कापूस खरेदी करण्यात आला नसला तरी वर्षाला १४ ते १५ कोटी रुपयांचा खर्च सुरूच आहे. परिणामी पणन महासंघाच्या तोट्यात भरच पडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT