crime news Married suicide after eight days of marriage amravati sakal
विदर्भ

लग्नाच्या आठ दिवसांनी विवाहितची आत्महत्या; विष केले प्राशन

आठ दिवसा पूर्वीच लग्न झाले; अचानक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याने आई, वडिलांना मोठा धक्का

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : तालुक्यातील निंभोरा देलवाडी येथील एका २१ वर्षीय विवाहित मुलीने कीटक नाशक विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक १८ जुलैरोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सेजल विश्वासराव काळबांडे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित मुलीचे नाव आहे, वडिलांने १० जुलै रोजी शहरातील मंगलकार्यालयात मोठ्या थाटामटात आपल्या एकुलत्या एक मुलीच लग्न लावून दिले, हाताच्या मेहंदीचा रंग सुद्धा उतरला नाही तर आठ दिवसा पूर्वीच लग्न झालेल्या सेजलनी अचानक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याने आई, वडिलांना मोठा धक्काच बसला आहे.

रविवार दिनांक १७ जुलै रोजी राहत्या घरात सेजलने कीटक नाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता,तेव्हा तिला उपचारार्थ अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तिची प्रकृतीत जास्त झाल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता आज ३:३० वाजताच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, दरम्यान सेजलच्या आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT