crime Two bodies in one place Murder suicide case sakal
विदर्भ

एकाच ठिकाणी दोन मृतदेह ; हत्या की आत्महत्या; पोलिसांची चौकशी सुरू

येणी पांढरी येथील शेतात एक महिला व पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली

सकाळ वृत्तसेवा

परतवाडा : नजीकच्या येणी पांढरी येथील शेतात एक महिला व पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही हत्या की आत्महत्या?, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यामुळे रात्रीपर्यंत याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुरुष व एका महिलेचा मृतदेह एकाच ठिकाणी आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर महिला मंगळवारपासून (ता. २२) बेपत्ता होती. कुटुंबातील सदस्यांनी संबंधित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार रात्रीच परतवाडा पोलिसांत नोंदविली होती. त्यानंतर बारा तासांच्या आत दुसऱ्याच दिवशी येणी पांढरी येथील एका शेतात रक्तबंबाळ अवस्थेत महिला व पुरुषाचा मृतदेह आढळला. त्यातील मृत महिला ही बेपत्ता झालेलीच महिला असून मृत पुरुषाचे नाव सुधीर बोबडे (वय ५२) असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोघांचेही मृतदेह शेतातील एका खोलीत भिंतीलगत बसलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यापैकी सुधीर यांच्या डोळ्यांवर गॉगल कायम होता. शिवाय दोघांचाही गळा धारदार शस्त्राने कापल्याच्या जखमा आढळून आल्या. मृत पुरुष आणि महिला दोघांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना घटनेसंदर्भातील माहिती देण्यात आली. परतवाडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. दोघेही एकाच परिसरात राहत असून विवाहित असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेनंतर फॉरेन्सिक लॅबची चमू आणि श्वानपथकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोघांच्याही कुटुंबीयांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. मंगळवारी दुपारी तीन वाजतापासून दोघेही बेपत्ता होते. तथापि एकच चाकू दोघांच्याही हातात कसा? हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरित आहे. दरम्यान, संबंधित महिलेचा पती उशीरा रात्री पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचल्याची माहिती आहे.

पर्स, मोबाईल, दुचाकी घटनास्थळीच

तपास सुरू केल्यानंतर मृतदेहापासून काही अंतरावर महिलेची पर्स, दोन मोबाईलसह बोबडे यांची दुचाकी आढळली. परतवाडा पोलिसांनी या सर्वच वस्तू जप्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT