लाखनी : नांगरणी केलेल्या जागेची पाहणी करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व तलाठी.
लाखनी : नांगरणी केलेल्या जागेची पाहणी करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व तलाठी. 
विदर्भ

शासकीय जागेवरील झाडांची कत्तल, रोपवनावर चालवला नांगर

मिथिलेश गिरेपुंजे

लाखनी (जि. भंडारा) :  ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत सावरी ग्रामपंचायतीने शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात रोपे लावण्यात आली. मात्र ही वृक्ष नष्ट करून लाखनी येथील आरोपी सीताराम डोमा गिरेपुंजे व रामकृष्णा सीताराम गिरेपुंजे यांनी त्या जागेवर नांगरणी करून अतिक्रमण केले. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामपंचायत सावरी येथे 2018-19 या वर्षात शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 370 मधील शासकीय जागेवर शेकडो वृक्षांची लागवड केली होती.

जागा हडपण्यासाठी केली नांगरणी

या जागेलागत आरोपीची शेतजमीन आहे. सदर जागा हडपण्यासाठी आरोपीने त्या जमिनीवर नांगरणी केली. त्यामुळे जमिनीवर लावलेली वृक्षे नष्ट करण्यात आली. यामुळे ग्रामपंचायतीचे 16,500 रुपयांचे नुकसान झाले आहे, असा आरोप ग्रामपंचायतमार्फत दिलेल्या तक्रारीत नमूद केला आहे.याबाबत लाखनी पोलिसांनी पोलिसांनी सीताराम डोमा गिऱ्हेपुंजे व रामकृष्णा सीताराम गिऱ्हेपुंजे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अन्यथा न्यायालयात जाऊ
सदर जागा सावरी ग्रामपंचायतीची आहे. या जागेवर आम्ही अतिक्रमण होऊ देणार नाही. यासाठी उपोषण करावे लागले; तरी आम्ही मागे हटणार नाही. न्याय मिळविण्यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ.
-सचिन बागडे
उपसरपंच, सावरी ग्रामपंचायत.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT